डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं खूप सामान्य आहे (Dark Circle). डार्क सर्कल येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे स्क्रीन टायमिंग वाढल्यामुळे डार्क सर्कल वाढतात. ज्यामुळे चेहऱ्याची शोभा कमी होते, आणि डोळे कायम थकलेले दिसतात. जर आपण देखील डार्क सर्कलमुळे त्रस्त असाल तर, ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहा (Skin care tips).
कॉफीचा वापर करूनही आपण डार्क सर्कल घालवू शकता. कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे कॉफी त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. डार्क सर्कल घालवण्यासाठी कॉफीचा वापर कसा करावा? पाहूयात(How to use coffee for dark circles? beauty secret for glowing skin).
'या' पद्धतीने घालवा डार्क सर्कल
पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल
लागणारं साहित्य
कॉफी
एलोवेरा जेल
हळद
मध
अशा पद्धतीने करा डार्क सर्कल रिमुव्हल क्रीम
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मध, एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपले डार्क सर्कल रिमुव्हल क्रीम रेडी. सर्वात आधी चेहरा धुवून घ्या. तयार पेस्ट डोळ्यांखाली लावा. काही वेळासाठी ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या.