Join us  

डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाले? कॉफीत मिसळून '१' गोष्ट लावा; डोळे दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 5:43 PM

How to use coffee for dark circles? beauty secrets : डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी कॉफीचा करा 'असा' वापर..

वाढत्या स्क्रीन टायमिंगमुळे डोळे प्रचंड थकतात (Skin Care Tips). डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. ज्यामुळे डोळे आत ओढल्यासारखे वाटतात. डोळे फार नाजूक असतात. त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे (Eye Care Tips). काहींचा असा गैरसमज आहे की, फक्त स्क्रीन टायमिंगमुळे डोळ्यांखाली सुरकुत्या आणि डार्क सर्कल येतात (Dark Circles). पण असे नाही.

शरीरात पोषक आहाराची कमतरता, व्हिटॅमिन सी ची कमतरता, आणि व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डार्क सर्कल निर्माण होतात. जर आपल्याही डोळ्यांखाली डार्क सर्कल निर्माण झाल्या असतील तर, आहारात काही बदल करा. शिवाय कॉफीचा सोपा करून पाहा. डार्क सर्कल निघून जाईल. शिवाय डोळे कायम टवटवीत फ्रेश दिसतील(How to use coffee for dark circles? beauty secrets).

डार्क सर्कल घालवण्यासाठी कॉफीचा सोपा उपाय

लागणारं साहित्य

ग्रीन टी

पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

कॉफी

थंड दूध

व्हिटॅमिन-ई कॅप्सूल

या पद्धतीने तयार करा डार्क सर्कल रिमुव्हल क्रीम

एका बाऊलमध्ये एक चमचा ग्रीन टी पावडर घ्या. त्यात एक चमचा कॉफी, एक चमचा थंड दूध घालून मिक्स करा. नंतर त्यात २ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल घालून मिक्स करा. अशा प्रकारे डार्क सर्कल रिमुव्हल क्रीम रेडी.

कलर - डायशिवाय केस काळे करायचेत? चमचाभर मेथी दाण्यांचा सोपा उपाय; केस होतील दाट आणि..

तयार क्रीम डोळ्यांखाली लावण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या. डोळ्यांखाली क्रीम लावा. ५ मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटांसाठी डोळ्यांखाली क्रीम तशीच ठेवा. नंतर टिश्यू पेपरने पुसून काढा. आणि शेवटी तोंड धुवा. यामुळे स्किन क्लिअर होईल, व डोळेही टवटवीत दिसतील.

स्किनसाठी कॉफीचे फायदे

कॉफी त्वचेच्या मृत पेशींना बाहेर काढते. शिवाय त्वचा उजळ करते. कॉफी एक नैसर्गिक एक्सफोलिएटिंग स्क्रब आहे. आपण यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे स्किन क्लिअर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी