Join us  

केस गळून खराटा झाले? कॉफीमध्ये मिसळा घरातलं एक खास तेल, केस इतके वाढतील की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2024 10:10 AM

How to use coffee for hair growth : कंबरेपर्यंत वाढतील केस-दिसतील काळेभोर, केसांना फक्त कॉफीमध्ये मिसळून एक तेल लावा..

अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने (Coffee) होते. सकाळी एक कप कॉफी प्यायल्याने शरीरात तरतरी येते. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहे. ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यासह याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण आपण कधी कॉफीचा वापर केसांसाठी करून पाहिलं आहे का? कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात (Hair Growth). जे स्काल्पची त्वचा स्वच्छ करून केसांची मुळे मजबूत करतात. मुख्य म्हणजे यामुळे केस गळती थांबते.

जर आपल्या केसांची योग्य वाढ व्हावी यासह गळू नये असे वाटत असेल तर, कॉफीमध्ये एक गोष्ट मिसळून केस आणि स्काल्पवर लावा. यामुळे केसांना फायदा होईलच, शिवाय अनेक समस्याही सुटतील(How to use coffee for hair growth).

केसांच्या समस्येसाठी कॉफीचा उपाय

एक कप कॉफी पिऊन आपण सकाळची सुरुवात करतो. पण केसांसाठी कॉफीचा वापर कसा करावा? हे अनेकांना ठाऊक नाही. केसांची वाढ व्हावी असे वाटत असेल तर, कॉफीमध्ये खोबरेल तेल मिसळून लावा. यासाठी आपल्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या, त्यात एक किंवा २ चमचे कॉफी पावडर मिक्स करा. केस विंचरून घ्या, आणि तयार पेस्ट स्काल्प आणि केसांना लावा. काही वेळानंतर आपण केस माईल्ड शाम्पूचा वापर करून धुवू शकता.

केस गळतात-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज खा 'हे' दाणे-भरभर केस वाढण्याचं सिक्रेट

केसांसाठी कॉफी आणि खोबरेल तेलाचे फायदे

कॉफीमध्ये रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी२, नियासिन, व्हिटॅमिन बी३, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फिनोलिक कंपाऊंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. ज्याचा फायदा केसांना पुरेपूर होतो.

काखेतल्या काळपट डागांमुळे स्लिव्हजलेस ड्रेस घालणं टाळताय? ३ नैसर्गिक उपाय-दिसेल झ्टपट बदल

खोबरेल तेलात अँटी-मायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसोबत, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. जे शरीर तसेच, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स