Join us  

Hair care tips: कंडिशनर केसांना नेमकं कसं आणि किती लावावं? कमी- जास्त लावण्याचा ५ चुका, केस हमखास खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 5:55 PM

Hair care tips: केस धुतले की कंडिशनर लावता पण केसांना कंडिशनर (How to use conditioner) बरोबर लागतंय की नाही, त्याचं प्रमाण अचूक आहे की नाही, हे कसं ओळखायचं.... त्यासाठीच तर वाचा या काही महत्त्वाच्या खास टिप्स!

ठळक मुद्देकंडिशनरचा नियमित वापर करत असाल, तर कंडिशनर संदर्भात या काही गोष्टींची माहिती आपल्याला असायलाच पाहिजे..

शाम्पू केल्यावर केसांना कंडिशनिंग (how to know the correct quantity of conditioner) करायचं, हे आपल्याला माहिती असतं. पण कंडिशनरचा वापर आपल्याकडून योग्य पद्धतीने होतो की नाही, कंडिशनरचं प्रमाण कमी होतंय, जास्त होतंय की अगदी बरोबर आहे, हे कसं ओळखायचं हे आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं. कंडिशनर जर केसांना जास्त होत असेल तर त्यामुळे नक्कीच केसांचं नुकसान होऊ शकतं. किंवा तुम्ही जर कमी प्रमाणात वापरत असाल तर त्यामुळेही केसांना योग्य तेवढा फायदा मिळू शकत नाही. म्हणूनच कंडिशनरचा नियमित वापर करत असाल, तर कंडिशनर संदर्भात या काही गोष्टींची माहिती आपल्याला असायलाच पाहिजे..

 कसा करायचा कंडिशनरचा परफेक्ट वापर(how to use conditioner properly)१. तुम्ही तुमच्या पुर्ण केसांना कंडिशनर लावू शकता. पण ज्यांचे केस पातळ किंवा तेलकट आहेत, अशा लोकांनी केवळ केसांच्या खालच्या लांबीवर कंडिशनर लावावे. अशा लोकांनी आठवड्यातून एकदाच कंडिशनर वापरावे.२. ज्यांचे केस दाट किंवा कुरळे आहेत, त्यांनी अधिक प्रमाणात कंडिशनरचा वापर करावा. आठवड्यातून दोन- तीन वेळा कंडिशनर वापरले तरी चालते. 

 

केसांना कंडिशनर जास्त होतंय हे कसं ओळखायचं? (are you applying over conditioner to hair?)शाम्पूप्रमाणेच कंडिशनरमध्येही रसायनांचा खूप जास्त वापर केलेला असतो. त्यामुळे जर तुमच्या केसांवर सतत कंडिशनरचा मारा होत असेल, तर त्यामुळे केसांना फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते. शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये जर असा काही बदल जाणवत असेल, तर केसांना कंडिशनर जास्त होतंय, असा त्याच अर्थ होतो.- केस खूप जास्त चिकट किंवा फ्रिजी होणे.- केस अजिबातच बाऊन्सी म्हणजे फुललेले नसणे.- केस पातळ वाटणे.- केसांवर खूप जास्त चमक येणे. ते ग्लॉसी दिसू लागणे.- केस विंचरायला त्रास होणे.- केसांवरून हात फिरवल्यास हाताला काही तरी लागले आहे, अशी जाणीव होणे 

 

केसांना कंडिशनर कमी तर पडत नाही ना....(are you applying less conditioner to hair?)केसांसाठी कंडिशनरचं प्रमाण कमी होत असेल, तर त्याचाही काही उपयोग नाही. जर कंडिशनरचा व्यवस्थित फायदा करून घ्यायचा असेल तर कंडिशनरचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. म्हणूनच जर केस धुतल्यानंतर अशी काही लक्षणं केसांमध्ये दिसली तर कंडिशनरचं प्रमाण कमी होणं हे त्याचं कारण असू शकतं. त्यामुळे कंडिशनरचा वापर वाढवून पहा.- केसांमध्ये खूप जास्त गुंता होणे- केस तुटण्याचं प्रमाण वाढणे- केस कुरळे- कुरळे दिसू लागणं.- केस एकदमच निस्तेज आणि रुक्ष होणं.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी