Lokmat Sakhi >Beauty > फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्यानं पांढरे केस करा काळे, सोपा उपाय-केस होतील काळेभोर-लांब

फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्यानं पांढरे केस करा काळे, सोपा उपाय-केस होतील काळेभोर-लांब

How to Use Curry Leaves for Grey Hairs : हेअर डाय किंवा ग्लोबल कलरचा केसांना काळे करण्यसाठी वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 05:45 PM2023-05-16T17:45:36+5:302023-05-18T14:24:49+5:30

How to Use Curry Leaves for Grey Hairs : हेअर डाय किंवा ग्लोबल कलरचा केसांना काळे करण्यसाठी वापर केला जातो.

How to Use Curry Leaves for Grey Hairs : Curry Leaves A Boon For Premature Greying Hair | फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्यानं पांढरे केस करा काळे, सोपा उपाय-केस होतील काळेभोर-लांब

फक्त ५ रुपयांच्या कढीपत्त्यानं पांढरे केस करा काळे, सोपा उपाय-केस होतील काळेभोर-लांब

वाढत्या वयाचा परीणाम चेहऱ्यावर आणि केसांवरही दिसतो. केस पातळ आणि पांढरे होऊ लागतात. पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये कमी वयाच्या लोकांमध्ये केसांच्या संबंधित समस्या उद्भवतात. (White Hairs Control Tips)  केस पांढरे होणं, हेअर फॉल, कोंडा, केस पिकणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हेअर डाय किंवा ग्लोबल कलरचा केसांना काळे करण्यसाठी वापर केला जातो. (How to use curry leaves for grey hairs)

वेगवेगळे शॅम्पू, तेल लावून केस काळे करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे फायदे होण्याऐवजी नुकसानाचा सामना करावा लागतो. कढीपत्त्याचा आहारात आणि हेअर केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास केसांशी संबंधित समस्या उद्भवतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीन्स असतात. ज्यामुळे फ्री रेडिकल्सपासून सुटका होते आणि गळणारे केस रोखण्यास मदत होते. 

कढीपत्त्याचा हेअर पॅक कसा बनवायचा?

कढीपत्त्याचा पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढीपत्त्याची मूठभर पानं घ्या च्यात ३ मोठे चमचे दही घालून बारीक करून घ्या. त्यानंतर हा हेअर मास्क केसांना व्यवस्थित लावा. हा मास्क अर्ध्या तासापर्यंत केसांना लावलेला राहू द्या. नंतर स्वच्छ पाणी आणि शॅम्पू लावून केस स्वच्छ धुवून घ्या. कढीपत्त्याची पेस्ट तुम्ही तेलात मिसळूनही लावू शकता.

समोरचे केस खूप पांढरे झालेत? २ चमचे मेथीच्या हेअर पॅकची जादू; काळेभोर होतील पिकलेले केस

कढीपत्त्याच्या पानांमध्ये व्हिटामीन बी-५ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे मुळांना पोषण मिळते. हे व्हिटामीन  गळणारे केस आणि कोंडा दूर करते. हे स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढवून केसांच्या  मुळांना मजबूत करते. या पानांमध्ये एंटी ऑक्सिडंट्स, बीटा कॅरोटीन, प्रोटीन्स आणि आयर्न केसाचं गळणं थांबवून केसांना पातळ होण्यापासून रोखते. याव्यतिरिक्त त्यातील अमिनो एसिड्स केसांना हेल्दी आणि मजबूत बनवतात. 

आहारात कढीपत्त्याचा समावेश करून तुम्ही केस पांढरे होणं टाळू शकता. कढीपत्त्यात व्हिटामीन बी असते. जे केसांच्या फॉलिक्लसमध्ये मेलेनिनच्या उत्पादन वाढते. ही पानं केस काळे होण्याची शाश्वती देत नाही पण केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. याव्यतिरिक्त पोटाच्या समस्यांवरही कढीपत्ता उत्तम असतो. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते.  

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; हृदय राहील ठणठणीत

यात एंटी फंगल गुणधर्म असतात ते केसांच्या ड्रायनेसपासून संरक्षण करतात आणि कोंड्यापासून संरक्षण देतात.  ही पानं खाणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. कढीपत्त्यात एंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात. यामुळे केसाचं गळणं कमी होण्यास मदत होते. स्काल्पचा संक्रमणापासून बचाव होतो. 

Web Title: How to Use Curry Leaves for Grey Hairs : Curry Leaves A Boon For Premature Greying Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.