Lokmat Sakhi >Beauty > चमचाभर तुपात मिसळा एक खास गोष्ट, ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय; लावताच दिसेल जादुई फरक

चमचाभर तुपात मिसळा एक खास गोष्ट, ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय; लावताच दिसेल जादुई फरक

How to use desi ghee in Winter-Ghee for Glowing skin : लावा तूप-दिसेल झटकन रूप, महागड्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त असरदार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 02:42 PM2024-01-21T14:42:03+5:302024-01-21T14:42:59+5:30

How to use desi ghee in Winter-Ghee for Glowing skin : लावा तूप-दिसेल झटकन रूप, महागड्या अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा जास्त असरदार..

How to use desi ghee in Winter-Ghee for Glowing skin | चमचाभर तुपात मिसळा एक खास गोष्ट, ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय; लावताच दिसेल जादुई फरक

चमचाभर तुपात मिसळा एक खास गोष्ट, ड्राय स्किनसाठी जबरदस्त उपाय; लावताच दिसेल जादुई फरक

हवामानानुसार त्वचेचा (Skin Care) पोत बदलतो. हिवाळा सूर झाला की, त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी होऊ लागते. कोरड्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर, अनेक समस्या उद्भवू लागतात. पण हिवाळ्यात त्वचेची जितकी काळजी घेतली तरी ती कमीच ठरते. मुख्य म्हणजे ड्राय स्किनमुळे त्वचेवर मेकअप उठून दिसत नाही. यावर उपाय म्हणून आपण अनेक सौंदर्य उत्पादनांचा वापर करून पाहतो. पण त्यातील केमिकल रसायनांमुळे चेहरा आणि त्वचेचा पोत आणखी बिघडतो.

स्किनला मॉइश्चरायझ करायचं असेल, शिवाय त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर, सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा तुपाचा वापर करून पाहा (Beauty Tips in Winter). 'खाल तूप तर येईल रूप' ही म्हण तर आपण ऐकलीच असेल, आणि ही  म्हण तंतोतंत खरी ठरते. आपण तूप न खाता चेहऱ्यावर लावूनही स्किनची काळजी घेऊ शकता. तुपाचा वापर चेहऱ्यावर नेमका कसा करावा? पाहा(How to use desi ghee in Winter-Ghee for Glowing skin).

चेहऱ्यावर तुपाचा वापर कसा करावा?

तूप

एलोवेरा जेल

४ भेंड्या चिरा-पाण्यात उकळवा- केस गळतीवर घ्या स्वस्तात सोपा उपाय- केस चमकतील

हिवाळ्यात स्किन ड्राय होऊ नये, यासह कायम कोमल दिसावी असे वाटत असेल तर, तुपाचा वापर करा. यासाठी एका वाटीत २ चमचे तूप घ्या. तुपाला थोडे गरम करा. तूप कोमट झाल्यानंतर त्यात एलोवेरा जेल घालून मिक्स करा. त्याचे २ ते ३ थेंब चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा.

मसाज केल्याने तूप त्वचेच्या पोर्समधून आत शिरते, व चेहऱ्याला पोषण देते. याचा वापर आपण चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी करू शकता. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून ४ ते ५ वेळा करू शकता. यामुळे काही दिवसात आपणास बदल दिसून येईल.

चेहऱ्यावर तूप आणि एलोवेरा जेल लावण्याचे फायदे

तूप

तुपातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि आर्द्रता बंद करून पोत सुधारतात. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

मानेचा काळपटपणा होईल अर्ध्या टोमॅटोने दूर, पाहा इन्स्टंट उपाय; डाग होतील गायब-मान चमकेल

एलोवेरा जेल

एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी असते, जे त्वचेला मुबलक प्रमाणात पोषण देते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात.

Web Title: How to use desi ghee in Winter-Ghee for Glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.