मेकअप करताना डोळ्यांचे सौंदर्य खुलून येण्यासाठी आयमेकअप करण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. आयमेकअप करताना काजळ, आयलायनर, आय शॅडो, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. यामुळे आपले डोळे अधिकच आकर्षक दिसतात. आय मेकअप करताना आय लायनरला विशेष महत्व असते. वेगवेगळ्या पद्धतींनी आयलायनर लावून डोळ्यांना छानसा असा हटके लूक दिला जातो. प्रत्येकीच्या बेसिक मेकअप किटमध्ये आयलायनर हे कायम असतेच(How to do eyeliner if you don't have eyeliner).
आजकाल ऑफिस किंवा कुठे बाहेर जाताना पावडर, काजळ, लिपस्टिक तर आपण लावतोच, तेवढ्याच सहजनेते आजकाल आयलायनर देखील आवर्जून लावले जाते. आता केवळ लग्न, समारंभ, पार्टी किंवा एखाद्या खास प्रसंगांपुरताच आय लायनरचा वापर मर्यादित राहिलेला नाही. आयलायनर हे आता आपल्या मेकअपमधील डेली रुटीनची एक गोष्ट झाली आहे. सध्या तर आयलायनरचा (How to use eyeshadow as eyeliner) एवढा ट्रेंड आला आहे की आजकाल काजळ न लावताच आयलायनरचा वापर सुरु झाला आहे. असे आपले रोजच्या वापरातील आयलायनर काहीवेळा वापरुन संपते किंवा कधी अलायनरच्या बाटलीतील लायनर सुकून जाते, अशावेळी जर आपल्याला आयलायनर लावायचे असेल तर खूप मोठी पंचाईत होते. अशावेळी गडबडून न जाता लायनर लावण्याची सोपी ट्रिक पाहूयात(How To Quickly Convert Any Eyeshadow into Eyeliner).
आयलायनरच्या बाटलीतील लायनर सुकले किंवा संपले तर वापरा ही भन्नाट ट्रिक...
जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा रोज आयलायनरचा वापर करत नसाल तर अशावेळी मेकअप'किटमधील लायनर सुकून जाते. याचबरोबर काहीवेळा आयलायनर आपण विसरतो किंवा ते संपते अशावेळी आपल्याकडे आयलायनर लगेच उपलब्ध नसते. अशा परिस्थिती नेमकं काय करायचे ते पाहूयात.
फेशियल ग्लो जास्त दिवस हवा तर करु नका या ८ चुका, नाहीतर ग्लो होईल गायब...
आपल्या मेकअप किटमध्ये आयलायनर जरी नसेल तरीही आपण डोळ्यांना आयलायनर लावून अधिक आकर्षक करु शकतो. यासाठी सर्वात आधी मेकअप किटमधील आयशॅडोचे पॅलेट घ्यावे. या पॅलेटमध्ये आयशॅडोचे वेगवेगळ्या रंगांचे शेड्स उपलब्ध असतात. यातील काळ्या रंगाचा शेड घेऊन त्यावर हेअर सेटिंग स्प्रे किंचितसा फवारून तो आयशॅडो हलकासा ओला करुन घ्यावा. त्यानंतर या भिजवलेल्या आयशॅडोची थोडीशी ओलसर पेस्ट करुन घ्यावी. आता आय मेकअप करण्याचा बारीक ब्रश किंवा आयलायनरच्या बाटलीतील ब्रश घेऊन त्याने हे आयलायनर डोळ्यांवर लावून घ्यावे.
अशाप्रकारे जर आपल्याला वेगवेगळ्या रंगांचे किंवा ड्रेसला मॅचिंग होणारे आयलायनर लावायचे असेल तर आपण अनेक रंगांच्या आयशॅडोचा वापर करुन झटपट रंगीबेरंगी आयलायनर लावून आपला लूक पूर्ण करु शकतो.