आपले केस लांबसडक, दाट असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. स्त्रीचं खरं सौदर्यंत केसांवरच असते असे म्हटले जाते. पण वाढत्या वयात आपल्या शरीरात जसे बदल होतात तसेच केसांमध्येही बदल होत जातात. आजकाल तरूणपणातच केस गळण्याचं प्रमाण वाढलंय केस गळणं कमी करण्यासाठी लोक बऱ्याच पार्लर ट्रिटमेंट्स करतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. घरच्याघरी सोपे उपाय करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता. (How To Use Flax Seeds For Hair Growth)
केसांची चांगली वाढ होण्यासाठी सिरम बनवणं एकदम सोपं आहे. बाजारात अनेक प्रकारचे सिरम उपलब्ध असले तरी घरगुती सिरम तुम्हाला उत्तम परिणाम मिळवून देईल. सगळ्यात आधी एक भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा त्यात २ चमचे आळशीच्या बिया घाला. (How to Use Flaxseed for More Beautiful Hair) बिया व्यवस्थित शिजल्यानंतर गाळून घ्या. त्यात एक चमचा नारळाचं तेल, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, १ चमचा कांद्याचा रस घालून मिश्रण बनवा. स्वच्छ केसांना हे सिरम लावा केसांच्या मुळांना आणि लांबीला हे सिरम लावल्यानंतर १ तास केस तसेच राहू द्या नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा. या उपायाने केस लांबसडक, दाट होण्यास मदत होईल.
आळशीच्या बीया केसांना हेल्दी आणि शायनी बनण्यास मदत करतात. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामीन बी असते. यामुळे केस मजबूत होतात आणि केसांचा कोरडेपणा दूर होऊन सिल्की आणि शायनी केस होतात. केसांना मॉईश्चर येण्यासाठी आळशीच्या बिया फायदेशीर ठरतात.ड्राय स्काल्पची समस्या दूर होते. यातील ओमेगा-३ फॅटी एसिड्स केसांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात.
केस लवकर पिकलेत, मग डाय कशाला? मेहेंदीत १ पदार्थ मिसळून लावा; काळेभोर होतील केस
यामुळे केसांतील कोंडा कमी होतो आणि केसांना फाटे फुटणंही कमी होतं. आळशीच्या बिया केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन-बी देखील मुबलक प्रमाणात आढळते. हे केसांना ताकद देते तसेच केसांचा कोरडेपणा दूर करून त्यांना रेशमी आणि चमकदार बनवते.