कधी कधी स्किनला उजळ करणारे उत्पादन घरीच असतात (Skin Whitening). पण आपल्याला त्याचा वापर कसा करावा हे ठाऊक नसतं. त्यातील एक म्हणजे अळशीच्या बिया. बहुतांश घरांमध्ये आपल्याला अळशीच्या बिया आढळतील (Beauty Tips). अळशीच्या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतं.
त्याचबरोबर यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन आणि फायटोअॅस्ट्रोजन आढळते (Skin Care Tips). हे सगळे गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पण फक्त आरोग्यासाठी नसून, त्वचेसाठीही याचे अनेक फायदे आहेत. जर आपल्याला चमकणारी त्वचा हवी असेल तर, अळशीच्या बियांचा वापर नेमका कसा करावा? हे पाहा. यामुळे आतून त्वचा रिपेअर होईल, आणि स्किन ग्लो करेल(How to Use Flaxseed For Skin Whitening?).
अळशीच्या बियांचे सेवन कसे करावे?
सर्वात आधी, एका बाऊलमध्ये २ चमचा अळशीच्या बिया घ्या. त्यात पाणी घालून बिया आधी धुवून घ्या. एक ग्लासभर पाणी घ्या. त्यात अळशीच्या बिया घालून झाका. रात्रभर पाण्यात अळशीच्या बिया भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी अळशीच्या बियांचे पाणी प्या. या पाण्यात आढळणारे मुख्य घटक त्वचेचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवू शकतात.
पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..
अळशीच्या बियाचे पाणी पिण्याचे फायदे
स्किन डिटॉक्स करण्यासाठी आपण अळशीच्या बियाचे पाणी पिऊ शकता. जर चेहऱ्यावर मुरुमांचे डाग वाढत असतील तर, महिनाभर फ्लॅक्ससीडचे पाणी प्या. यामुळे पिंपल्सची समस्याही कमी होते.
एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं..
फ्लॅक्ससीडमध्ये आढळणारे घटक
फ्लॅक्ससीडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे आढळतात. ज्यामुळे त्वचेची हरवलेली चमक परत आणण्यासाठी प्रभावी ठरते. जर आपण अळशीच्या बियाचे पाणी नियमित पीत असाल तर, त्वचेचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते.