Lokmat Sakhi >Beauty > केस गळताहेत-समोर टक्कल पडलंय? चमचाभर आळशीच्या बियांचा खास उपाय, भराभर उगवतील केस

केस गळताहेत-समोर टक्कल पडलंय? चमचाभर आळशीच्या बियांचा खास उपाय, भराभर उगवतील केस

How To Use Flaxseeds For Beautiful Hair : वजन कमी होऊन केस दाट-लांब होण्यास मदत होते.  केसांची लांबी वाढवण्यात या बिया फायदेशीर ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 04:05 PM2024-02-09T16:05:25+5:302024-02-09T16:42:43+5:30

How To Use Flaxseeds For Beautiful Hair : वजन कमी होऊन केस दाट-लांब होण्यास मदत होते.  केसांची लांबी वाढवण्यात या बिया फायदेशीर ठरतात.

How To Use Flaxseeds For Beautiful Hair : Easy Ways To Use Flaxseeds For Smooth Hairs | केस गळताहेत-समोर टक्कल पडलंय? चमचाभर आळशीच्या बियांचा खास उपाय, भराभर उगवतील केस

केस गळताहेत-समोर टक्कल पडलंय? चमचाभर आळशीच्या बियांचा खास उपाय, भराभर उगवतील केस

आजकाल  लोक फॅन्सी, पॅकेड फुडकडे वळतात आणि हेल्दी राहण्याचा विचार करतात.  पण या पदार्थांपेक्षा घरच्या वापरात असलेले आणि पूर्वापार घरगुती स्वयंपाकात वापरले जाणारे काही पदार्थ आरोग्यासाठी वरदान ठरतात.  ड्रायफ्रुट्स आणि फळांच्या सेवनाकडे लोक अधिकाधिक लक्ष देतात.( How to Use Flaxseeds For Hair)  याशिवाय बियांच्या सेवनानेही शरीराला बरेच फायदे मिळतात ज्यामुळे फक्त केसांची ग्रोथ होत नाही केसांची मजबूती टिकून राहते. वजन कमी होऊन केस दाट-लांब होण्यास मदत होते. केसांची लांबी वाढवण्यात या बिया फायदेशीर ठरतात. (Easy Ways To Use Flaxseeds For Smooth Hairs)

अळशीच्या बियांचे फायदे (How to Use Flaxseeds For Hair Growth)

अळशीच्या बियांना  हालीम असेही म्हणले जाते. गार्डन क्रेस प्लांटपासून प्राप्त होते.  अनेक वर्षांपासून ट्रेडिशनल मेडिसिनचा एक भाग आहे. पोषक तत्वांचा खजिना आहे यामुळे ऑलओव्हर  हेल्थ चांगली राहण्यास मदत होते.  अळिवाच्या बिया आणि हालीम हे पर्यायवाची शब्द आहेत. पोषक तत्व एक स्पेक्ट्रम प्रदान करते. डाएटसाठी  हा उत्तम पर्याय आहे.  आळशीच्या बियांनी गळलेले केस पुन्हा येण्यास मदत होते.

विशेषज्ञांच्या माहितीनुसार अळीवाच्या बिया हेअर हेल्थ चांगली ठेवण्यास मदत होते. केसांना पोषण मिळते. पोषण विशेषज्ञ लीमा महाजन यांच्यामते हलिमच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात. यातील एंटी ऑक्सिडेंट्स असतात. फॅट्स असतात केसांची ग्रोथ चांगली होते.

या बियांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स आणि जरूरी फॅट्स असतात. ज्यामुळे केसांच्या गुणवत्तेत सुधार होतो आणि केस दाट होतात. यासाठी सगळ्यात आधी  एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात एलोवेरा आणि अळिवाच्या बिया घाला. नंतर गॅस बंद करा. नंतर हे मिश्रण थंड करून एका भांड्यात काढून घ्या नंतर केसांना लावा. यामुळे केसांवर  वेगळीच शाईन येईल.

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानुसार अळशीच्या बिया कॅल्शियम, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन ई आणि प्रोटीन, आयर्न आणि फोलिक एसिड्स यांसारखी पोषक तत्व असतात. पोषण विशेषज्ञ ऋजुती दिवेकर यांच्यामते अन्य पोषक तत्व प्रोटीन्स आणि डायटरी फायबर्स असतात. ज्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी

फॅट्स कमी करण्यासाठी तुम्ही वेट लॉस ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. आळशीच्या बिया हाय फायबर्सयुक्त असतात  ज्यामुळे सूज आणि पचनाच्या समस्या दूर होतात. पोषक विशेषज्ञांच्यामते अळिवाच्या बियांचे सेवन फॅटी फूड्ससोबत करणं हे  सगळ्यात उत्तम असतं. आठवड्यातून तीनवेळा अर्धा चमचा आळशीच्या बियांचे सेवन करा. 

Web Title: How To Use Flaxseeds For Beautiful Hair : Easy Ways To Use Flaxseeds For Smooth Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.