केसांसाठी हेअर जेल वापरण्यासाठी लोक बाजारातील महागडी उत्पादनं विकत घेतात. या केमिकल्सयुक्त हेअर स्प्रे मुळे केसांचे नुकसान हते. तेल, महागडे सिरम, तेल लावल्याने केस पातळ होणार नाहीत असं अनेकांना वाटतं. केस वाढायला लागले की गळतात अशी अनेकांची तक्रार असते. (How to Use Flaxseed for More Beautiful Hair Flaxseed Gel for Hair)
बाहेरचे केमिकल्सयुक्त हेअर स्प्रे वापरण्यापेक्षा घरच्याघरी केसांच्या वाढीसाठी जेल तयार केले तर केसांची वाढ चांगली होईल. आळशीच्या बीया केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. आळशीच्या बीयांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स, प्रोटीन् आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. आळशीच्या बीयांचे हेअर जेलही तुम्ही बनवू शकता. (How to Use Flaxseeds for Hair)
1) आळशीच्या बीयांचे हेअर जेल बनवणं खूपच सोपं आहे. आळशीच्या बीया पाण्यात भिजवल्यानंतर किंवा पाण्यात उकळवल्यानंतर त्यातून निघणारा चिकट पदार्थ अनेक पोषक तत्व प्रदान करतो. हे जेल तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घालून त्यात आळशीच्या बीया उकळून घ्या नंतर एका वेगळ्या भांड्यात वरून कॉटनचा कापड ठेवा. या कापडातून आळशीच्या बीयांचे पाणी गाळून घ्या नंतर आळशीच्या बीयांचे हे जेल एका काचेच्या बरणीत भरून ठेवा.
केस गळणं ताबडतोब थांबवायचंय? 8 कारणं समजून घ्या- खर्च न करता लांब, सुंदर केस मिळतील
2) हे जेल केसांना लावून व्यवस्थित मसाज करा. केसांच्या लांबीपासून केसाांच्या मुळांना हे जेल लावा. यात व्हिटामीन ई असते जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हेअर मास्क बनवण्यासाठी या आळशीच्या जेलमध्ये एलोवेरा जेल मिसळा. १० ते १५ मिनिटं लावल्यानंतर केस व्यवस्थित धुवून स्वच्छ करा. या उपायाने केस मऊ, मुलायम होण्यास मदत होईल.
3) आळशीच्या बीयांमध्ये दही मिसळून तुम्ही केसांवर लावू शकता. दह्यात या बीया मिसळून लावल्याने अनेक फायदे मिळतात. आळशीच्या बीया दह्याबरोबर केसांवर लावल्याने केसांच्या वाढीस मदत होते. केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होईल. आळशीच्या बीयांचे पावडर घेऊन त्यात दही मिसळून केसांना लावा २० मिनिटांनी माईल्ड शॅम्पूने केस धुवा.
रोज गळतात- केस पातळ झाले? सकाळी न चुकता १ लाडू खा; भराभर वाढतील-काळे राहतील केस
4) आळशीच्या बीयांचे तेलही तुम्ही केसांवर थेट अप्लाय करू शकता. आळशीच्या बीयांचे तेल बनवून स्काल्पवर मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होईल आणि केस वेगाने वाढतील. केस मजबूत होतील. आळशीच्या बीया स्काल्पशी संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.