Lokmat Sakhi >Beauty > केसांना मेहेंदी लावण्याचा कंटाळा? बघा फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा भन्नाट उपाय 

केसांना मेहेंदी लावण्याचा कंटाळा? बघा फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा भन्नाट उपाय 

Use Of Food Colour On Hair: पांढरे केस तात्पुरते लपवायचे असतील तर फूड कलरचा वापरण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(How to use food colour for colouring hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 03:15 PM2024-04-20T15:15:20+5:302024-04-20T15:16:11+5:30

Use Of Food Colour On Hair: पांढरे केस तात्पुरते लपवायचे असतील तर फूड कलरचा वापरण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(How to use food colour for colouring hair)

How to use food colour for colouring hair, use of food colour on gray hair | केसांना मेहेंदी लावण्याचा कंटाळा? बघा फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा भन्नाट उपाय 

केसांना मेहेंदी लावण्याचा कंटाळा? बघा फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा भन्नाट उपाय 

Highlightsहा उपाय करून तुम्ही केस रंगवले तर तो रंग तुम्ही पुन्हा केस धुवेपर्यंत चांगला टिकून राहील

पांढरे केस ही आज अनेक लोकांसमोर असणारी समस्या. अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुण मुलामुलींचे केसही पांढरे असतात. केस कलर करण्यासाठी डाय वापरणे नको वाटते. म्हणून अनेक जण मेहेंदी लावतात. पण मेहेंदी लावण्यासाठी थोडा निवांत वेळ काढावा लागतो. अशावेळी अचानक एखादा कार्यक्रम ठरला तर मग पांढरे केस कसे लपवायचे, हा मोठाच प्रश्न पडतो (use of food colour on gray hair). त्यासाठीच फूड कलर वापरून झटपट केस रंगविण्याचा हा सोपा उपाय एकदा पाहून घ्या. (How to use food colour for colouring hair)

 

केस रंगविण्यासाठी कसा करायचा फूड कलरचा वापर?

हा उपाय अतिशय भन्नाट आहे. आतापर्यंत खाद्य पदार्थाना रंग देण्यासाठी तुम्ही फूड कलरचा वापर केला असेल. आता हेच फूड कलर वापरून केस कसे रंगवायचे ते पाहूया.

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबा खात नसाल तर अमेरिकन डायबेटिक असोसिशनचा हा सल्ला वाचाच....

हा एक सुरक्षित उपाय आहे. त्यामुळे कधीतरी करून पाहायला हरकत नाही. शिवाय तो रंग आपण खाण्यासाठी वापरतो. त्यामुळे डाय किंवा हेअरकलरसारखे अतिजास्त केमिकल्स यात निश्चितच नसतात.

 

हा उपाय करून तुम्ही केस रंगवले तर तो रंग तुम्ही पुन्हा केस धुवेपर्यंत चांगला टिकून राहील. स्वस्तात मस्त आणि अगदी सोपा उपाय कसा करायचा ते पाहा..

हॉटेलमधली गरमागरम तंदुरी रोटी खाणं पडेल महागात- लठ्ठपणा, डायबिटीससोबतच मागे लागतील 'हे' आजार

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी केस धुवून घ्या. त्यानंतर एका वाटीत कंडिशनर टाका आणि त्यात थोडा फूड कलर मिसळा.

केस धुतल्यानंतर ओल्या केसांवरच हे रंग टाकलेलं कंडीशनर लावा आणि ८ ते १० मिनिटे ते केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर पुन्हा केस नुसत्या पाण्याने धुवून घ्या. केसांना छान रंग आलेला असेल.

 

Web Title: How to use food colour for colouring hair, use of food colour on gray hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.