Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील....

दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील....

How To Use Glycerine For Glowing Skin: दिवाळीच्या दिवसांमध्ये त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल तर अगदी आजपासूनच हा घरगुती उपाय सुरू करून टाका..(use of Glycerine for getting natural glow)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 04:53 PM2024-10-19T16:53:29+5:302024-10-19T16:54:42+5:30

How To Use Glycerine For Glowing Skin: दिवाळीच्या दिवसांमध्ये त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल तर अगदी आजपासूनच हा घरगुती उपाय सुरू करून टाका..(use of Glycerine for getting natural glow)

how to use Glycerine for glowing skin, use of Glycerine for getting natural glow, skin care routine using  Glycerine | दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील....

दिवाळीच्या आधी त्वचेवर करा ग्लिसरीनची जादू! चेहरा एवढा चमकेल की सगळे बघतच राहतील....

Highlightsरात्री झोपण्यापुर्वी हा उपाय केल्यास अधिक उत्तम. चेहऱ्यावर खूप छान चमक येईल.

दिवाळीची तयारी आता घरोघरी सुरू झालेली आहे. दिवाळीपुर्वी घराची स्वच्छता करणे, घर सुशोभित करणे, वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी, फराळाची तयारी अशी कित्येक कामं या दिवसांत प्रत्येकीच्याच मागे असतात. या कामांच्या धबाडग्यात मग स्वत:कडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतच नाही. पार्लरमध्ये जाऊन बसण्याएवढा निवांतपणा प्रत्येकीकडेच नसते (skin care routine using  Glycerine). म्हणूनच अगदी कमीतकमी वेळात आणि मुख्य म्हणजे कमीतकमी पैशांमध्ये त्वचेची काळजी घ्यायची असेल आणि त्वचेवर फेशियल केल्याप्रमाणे देखणा ग्लो आणायचा असेल (how to use Glycerine for glowing skin?) तर त्यासाठी ग्लिसरीन वापरून हे काही सोपे घरगुती उपाय लगेचच करून पाहा... (use of Glycerine for getting natural glow)

 

त्वचेसाठी ग्लिसरीनचा वापर कसा करावा?

त्वचेसाठी ग्लिसरीन कशा पद्धतीने वापरता येते, याविषयीची माहिती सांगणारा एक व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

१. त्यामध्ये सांगितलेला पहिला उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये २ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल टाका. याच मिश्रणात १ टेबलस्पून गुलाबपाणी टाका. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. त्यानंतर हा लेप स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने छान मसाज करा. हा लेप लावल्यानंतर चेहरा धुण्याची गरज नाही. रात्री झोपण्यापुर्वी हा उपाय केल्यास अधिक उत्तम. चेहऱ्यावर खूप छान चमक येईल.

 

२. चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करायचं असेल तर हा एक उपाय तुम्ही करू शकता. त्यासाठी २ टेबलस्पून ग्लिसरीन घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून लिंबाचा रस घाला. दोन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

मूड ऑफ झाला-खूपच उदास वाटतं? ५ पदार्थ खा- शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढून वाटेल फ्रेश

चेहरा धुवून स्वच्छ कोरडा करून घ्या. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांन चेहरा धुवा. चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होऊन चेहरा उजळ झाल्यासारखा जाणवेल. 

 

३. ग्लिसरीनचे काही थेंब हातावर घेऊन चेहऱ्याला मसाज करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपण्यापुर्वी हा उपाय तुम्ही करू शकता.

चकलीचा बेत नेहमीच फसतो- कडक होतात? १ किलो भाजणीची खास रेसिपी- चकल्या होतील खुसखुशीत

जर तुमची त्वचा ऑईली असेल तर ग्लिसरीनमध्ये काही थेंब गुलाबपाणी मिसळा. हा उपाय नियमितपणे केल्यास चेहरा खूप छान मॉईश्चराईज होतो. 


 

Web Title: how to use Glycerine for glowing skin, use of Glycerine for getting natural glow, skin care routine using  Glycerine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.