Join us

थंडीत त्वचा काळवंडली-कोरडी पडली? चमचाभर हिरवी मुगाची डाळ 'या' पद्धतीनं लावा; चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:21 IST

How To Use Green Moong Dal On Face : मूग डाळीला तुम्ही आपल्या स्किन केअर रूटीनचा भाग बनवू शकता.

हिरवी मुगाची डाळ प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात असते. मुगाच्या डाळीचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत.  बरेच लोक आजारी पडल्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी खातात.  यात अशी अनेक पोषक तत्व असतात  ती शरीराला फायदा देतात. (How To Use Green Moong Dal On Face) तुमच्या त्वचेवर ग्लो येण्यासाठीसुद्धा मूग डाळ फायदेशीर ठरते. मूग डाळीला तुम्ही आपल्या स्किन केअर रूटीनचा भाग बनवू शकता. ज्यामुळे त्वचेशी संबंधित त्रास बरे होतात. याचे कोणतेही साईड इफेक्ट्सही दिसत नाहीत. हिरवी मूगाची डाळ  वापरून चेहऱ्यावर ग्लो कसा मिळवता येईल ते समजून घेऊ. (Green Moong Dal Face pack Home Remedy)

फेसपॅक बनवून मूग डाळीचा वापर करा

तुम्ही चेहऱ्याला हेल्दी आणि ग्लोईंग बनवण्यासाठी हिरव्या मूग डाळीचा फेस पॅक लावू शकता. यासाठी रात्री पाण्यात कच्च्या दूधात २ चमचे हिरवी मूगाची डाळ भिजवून ठेवा.  सकाळी वाटून याची पातळ पेस्ट बनवा. यात तुम्ही आपले आवडते इंग्रेडिएंट्स घालू शकता. काही सुरक्षित इंग्रेडिएंट्स जसं की दही, गुलाबपाणी, मध, संत्र्याचे साल, बदामाची पावडर, ऑलिव्ह ऑईल, एलोवेरा, हळद हे पदार्थ फेसपॅकमध्ये वापरू शकता.

व्हिटामीन, प्रोटीनचा पॉवरहाऊस आहेत शेवग्याच्या शेंगा; आठवड्यातून एकदा खा, हाडं बळकट होतील

मूंग डाळीचा फेस वॉश बनवा

महागडे, हार्ष केमिकल्सयुक्त फेसवॉश लावणं टाळायला हवं.  घरातच तुम्ही  हिरव्या मूग डाळीचा फेसवॉश तयार करू शकता. सुंदर ग्लोईंग त्वचा मिळवण्याचा चांगला उपाय आहे. हा फेसवॉश बनवण्यासाठी  हिरवी मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून  घ्या.  नंतर तुम्ही चेहरा धुण्यासाठी हा फेस वॉश वापरू शकता.यात तुम्ही चंदन पावडर, कुडिंलबाची पावडर, हळद,  मुलेठी  यांसारखे पदार्थ घालून इफेटिव्ह बनवू शकता.   याचा वापर करण्यासाठी  चेहरा ओला करून नंतर पावडरमध्ये पाणी मिसळून लिक्विड बनवा. चेहऱ्याची मसाज करा.

त्वचेला भरपूर फायदे मिळतात

हिरव्या मूग डाळीचा नियमित चेहऱ्यासाठी वापर केल्यानं  त्वचा सुंदर दिसण्यास मदत होईल. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.  त्वचेवर टॅनिंग येत नाही. काही दिवसातंच चेहरा चमकदार दिसतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी