Lokmat Sakhi >Beauty > केसांना मेहेंदी लावल्यावर लाल रंग चढतो? त्यात मिसळा 'ही' १० रुपयांची पावडर; शायनी केस हवेत तर..

केसांना मेहेंदी लावल्यावर लाल रंग चढतो? त्यात मिसळा 'ही' १० रुपयांची पावडर; शायनी केस हवेत तर..

How To Use Henna and Indigo Powder As Natural Hair Dye? : मेहेंदी लावताना त्यात २ गोष्टी मिसळा; महिनाभर काळे राहतील केस आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 07:21 PM2024-10-01T19:21:27+5:302024-10-01T20:32:12+5:30

How To Use Henna and Indigo Powder As Natural Hair Dye? : मेहेंदी लावताना त्यात २ गोष्टी मिसळा; महिनाभर काळे राहतील केस आणि..

How To Use Henna and Indigo Powder As Natural Hair Dye? | केसांना मेहेंदी लावल्यावर लाल रंग चढतो? त्यात मिसळा 'ही' १० रुपयांची पावडर; शायनी केस हवेत तर..

केसांना मेहेंदी लावल्यावर लाल रंग चढतो? त्यात मिसळा 'ही' १० रुपयांची पावडर; शायनी केस हवेत तर..

आजकाल बरेच जण केसांच्या समस्येने त्रस्त आहेत (Hair care tips). पांढरे केस, केसात कोंडा, केस गळणे यामुळे लोकांना अधिक टेन्शन येतं. ज्यामुळे केस अधिक खराब होतात (Beauty Tips). केस काळे करण्यासाठी बाजारात भरपूर केमिकल कलर्स उपलब्ध आहेत, पण त्यांचे तोटेही अनेक आहेत. ज्यामुळे केस काळे होतात तर खरे, पण केस अधिक निर्जीव दिसू लागतात.

डायऐवजी काही लोकं मेहेंदीचा वापर करतात. पण मेहेंदीमुळे केस काळे होण्याऐवजी लाल होतात. जर केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग यावा असं वाटत असेल तर, त्यात १० रुपयांना मिळणारी १ गोष्ट मिसळा. यामुळे केसांना नवीन चमक मिळेल. शिवाय केस शाईन करतील(How To Use Henna and Indigo Powder As Natural Hair Dye?).

१० रुपयांची 'ही' गोष्ट घालताच होईल कमाल

- आजकाल मेहेंदीमध्येही भेसळ केली जाते. केसांना मेहेंदी लावल्यानंतर केस काळे होण्याऐवजी लाल होतात. शिवाय निर्जीवही होतात.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं? रोज खा ४ पैकी १ पदार्थ; निरोगी वजन वाढवण्यासाठी सोपा उपाय

- मेहेंदी लावल्यानंतर केसांना काळा रंग चढावा असं वाटत असेल तर, मेहेंदी तयार करताना त्यात कॉफी पावडर मिसळा. यामुळे नक्कीच केस काळे होतील आणि शाईन करतील.

- यासाठी एक लोखंडी कढई घ्या. त्यामध्ये फ्रेश हर्बल मेहेंदी पावडर घाला. नंतर त्यात पाणी, २ चमचे भिजलेला कात, आणि १ मोठा चमचा कॉफी घालून सर्व साहित्य एकजीव करा.

- साहित्य एकजीव झाल्यानंतर २-३ तास किंवा रात्रभर मेहेंदी भिजत ठेवा. ३ तासानंतर त्यात आणखीन १ चमचा कॉफी पावडर आणि लवंगाचे तेल घालून मिक्स करा.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

- ज्या पद्धतीने आपण केसांना मेहेंदी लावतो, त्याचप्रमाणे केसांना मेहेंदी लावा. ३- ४ तासांसाठी केसांवर मेहेंदी तशीच ठेवा. ४ तासानंतर पाण्याने केस धुवून घ्या. नंतर केसांना तेल लावा. त्याच्या दुसऱ्या दिवशी केस शाम्पूने धुवून घ्या. अशा प्रकारे केसांवर काळा रंग चढेल. शिवाय हा नैसर्गिक रंग सहसा लवकर निघणारही नाही. 

Web Title: How To Use Henna and Indigo Powder As Natural Hair Dye?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.