Join us  

जास्वंदीच्या फुलांपानांचा ‘असा’ बनवा घरगुती हेअर मास्क, केस होतील दाट - काळेभोर, खर्च फक्त २० रुपये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 4:19 PM

Hibiscus For Hair Growth : Hibiscus Hair Mask for Hair fall & extreme Hair Growth : आपण देखील जास्वंदीची पाने - फुले वापरून केसांसाठी घरगुती हेअर मास्क बनवू शकतो, हा हेअर मास्क नेमका कसा बनवायचा ते पाहूयात...

आजकाल सगळेच केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण आहेत. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्चा वापर करतो. हे अनेक प्रॉडक्ट्स केसांच्या समस्या दूर करण्याचा दावा करतात. असे असले तरीही या प्रॉडक्ट्समध्ये अनेक प्रकारचे रंग, केमिकल्स, रसायनं असतात, जे केसांच्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरतात. या प्रॉडक्ट्सच्या नियमित वापराने केसांचे सौंदर्य खराब होऊ शकते. केसांसाठी नैसर्गिक उपचार  हे सर्वोत्तम व फायदेशीर ठरतात, कारण ते केसांचे आरोग्य खराब करत नाहीत. याउलट केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात(How to use hibiscus flower and leaf for hair?).

पूर्वीच्या काळापासून केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जात असे. जास्वंदीची पाने व फुले केसांचे आरोग्य व सौंदर्य खुलवण्यासाठी वापरली जातात. केसांसाठी असणाऱ्या अनेक प्रॉडक्टसमध्ये जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा (HOMEMADE HIBISCUS HAIR MASK FOR STREAM HAIR GROWTH) वापर केला जातो. आपण देखील जास्वंदीची पाने व फुले वापरून केसांसाठी घरगुती हेअर मास्क बनवू शकतो. हा हेअर मास्क नेमका कसा बनवायचा ते पाहूयात(Hibiscus Hair Mask for Hair fall and extreme Hair Growth).      

साहित्य :- 

१. जास्वंदीची फुले - ३ ते ४ फुले २. जास्वंदीची पाने - ८ ते १० पाने ३. कडीपत्ता - १ कप४. दही - १ कप ५. कोरफड गर - २ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात जास्वंदीची फुले, जास्वंदीची पाने, कडीपत्ता, दही, कोरफड गर असे एकत्रित करावे. २. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची थोडी जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. ३. ही तयार पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावी. 

केसांसाठी जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क तयार आहे. 

हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत :- 

केसांमधील गुंता सोडवून केस मोकळे करून घ्यावेत.आता हाताच्या किंवा ब्रशच्या मदतीने हा हेअर मास्क केसांना लावावा. केसांच्या मुळांपासून सुरुवात करून केसांच्या टोकापर्यंत हा हेअर मास्क लावून हलक्या हाताने मसाज करावा. केसांच्या छोट्या छोट्या बटा घेऊन त्यांना हेअर मास्क लावल्यास संपूर्ण केसात हेअर मास्क व्यवस्थित लागला जातो.हेअर मास्क लावल्यानंतर २० मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. दर १५ दिवसांनी हा हेअर मास्क केसांना लावल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतील. 

केसांच्या अनेक समस्यांवर 'पोटली मसाज' एक उत्तम उपाय, केसांचे सौंदर्य राहील कायम...

जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क लावण्याचे फायदे :- 

१. हा हेअर मास्क लावल्याने स्कॅल्प थंड राहतो आणि केसगळती देखील कमी होते.२. जास्वंदाच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि ऍमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. फ्लेव्होनॉइड्समुळे डोक्याच्या भागात रक्ताभिसरण व्यवस्थित होते.३. जास्वंदाच्या फुलांमध्ये असणारे ऍमिनो अ‍ॅसिड केसांमध्ये केरेटिन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे केसांना शाईन येते आणि केस लांब, दाट होतात. ४. जास्वंदाच्या फुलांमध्ये असे गुणधर्म असतात जे आपल्या स्कॅल्पला उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी