ऊन्हामुळे किंवा त्वचेवर सतत घाण धूळ बसल्यामुळे काळपटपणा येतो आणि स्किन डल दिसू लागते. (Beauty Tips) त्वचेचा डलनेस घालवण्यासाठी बाजारात बऱ्याच महागड्या क्रीम्स उपलब्ध आहेत, पण या क्रिम्सच्या वापराचा उपयोग होतोच असं नाही. (How to Get Glow on Face) अनेकदा चेहऱ्याची पुरेपूर काळजी घेऊनही काळपटपणा दिसून येतो अशावेळी घरगुती उपाय गुणकारी ठरू शकतात. (Tanning Removal Home remedies)
चेहऱ्याचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी घरगुती पेस्ट कशी करायची?
सगळ्यात आधी एका वाटीत टोमॅटोची पेस्ट, १ चमचा कॉफी पावडर, १ चमचा हळद, २ चमचे तांदूळाचे पीठ, २ चमचे दही मिसळून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा. या उपायाने चेहऱ्यावर ग्लो येईल आणि टॅनिंगही निघून जाईल. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. (How to remove Tanning From Face)
हे घरगुती पदार्थ चेहऱ्याला लावल्याने काय फायदा होतो (Skin Benefits Of Home Remedies)
१) टोमॅटो पेस्ट
हेल्थ लाईनच्या रिपोर्टनुसार टोमॅटोमध्ये बिटा कॅरोटीन, ल्युटिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ज्यामुळे त्वचा एक्सफ्लोसिएट होण्यास मदत होते, सेल्युलर डॅमेजचा धोका कमी होतो आणि त्वचा टवटवीत राहते, त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यास मदत होते आणि चेहरा टवटवीत दिसतो.
२) कॉफी पावडर
कॉफी चेहऱ्याला लावल्याने एजिंग साईन्स दूर होण्यास मदत होते. डेड स्किन सेल्स कमी होतात. कॉफीमध्ये काही पदार्थ मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल.
पोट-मांड्या, मागचा भाग खूपच वाढलाय? सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पाणी प्या, झरझर घटेल चरबी
३) तांदूळाचे पीठ
तांदूळाचे पीठ आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येत नाहीत. १५ मिनिटं हा पॅक लावून ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. ज्यामुळे ब्लॅकहेड्स निघून जाण्यास मदत होईल.
४) दही
दही खाल्ल्याने तब्येतीला अनेक गुणकारी फायदे मिळतात तसंच दही लावल्याने त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासही मदत होते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहते, हायड्रेट राहते, त्वचेची इलास्टिसिटी वाढते, त्वचेला पोषण मिळते. एजिंग साईन्स कमी होतात.
पंख्यावर धुळीचे काळे थर? हात न लावता पंखा स्वच्छ करण्याच्या ४ ट्रिक्स, स्वच्छ दिसेल पंखा
५) हळद
हळदीच्या वापराने त्वचेवरचं टॅनिंग निघून जाण्यास मदत होते. त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि चेहरा टवटवीत फ्रेश दिसतो. हळद तुम्ही हाता-पायांनाही लावू शकता.