आजी-आजोबांच्या काळापासून मोहोरीचं तेल डोक्याला लावलं जात आहे. काहीजण खाण्यापिण्यात या तेलाचा वापर करतात तर काहीजण केसांना हे तेल लावतात (Hair Care Tips). मोहोरीचे तेल केसांना लावल्यानं केसाचं गळणं कमी होतं. या तेलामुळे केस भराभर वाढतात याशिवाय केस दाट होतात. मोहोरीच्या तेलात व्हिटामीन ए, डी, ई आणि के मोठ्या प्रमाणात असते. (How To Grow Hairs Naturally)
यात कॅल्शियम, आयर्न मोठ्या प्रमाणात असते. हे तेल स्काल्पसाठी फायदेशीर ठरते. यामुले हेअर फॉलिकल्स स्ट्राँग होण्यास मदत होते. डोक्याची मोहोरीच्या तेलानं मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. मोहोरीच्या तेलात कोणते २ पदार्थ घालून तुम्ही डोक्यावर लावू शकता ज्यामुळे केस गळणं कमी होईल ते पाहूया. (How To Use kalonji Seeds For Hairs)
गळणारे केस कमी करण्यासाठी तुम्ही तेलात कलौंजी आणि मेथीचे दाणे मिसळून लावू शकता. यासाठी एका मोठ्या वाटीत मोहोरीच्या तेल ठेवून त्यात एक चमचा कलौंजी आणि एक चमचा पिवळे मेथीचे दाणे घाला. जेव्हा तेल व्यवस्थित शिजेल तेव्हा तेल थंड करण्यासाठी ठेवा. तेल थंड झाल्यानंतर गाळून एका बरणीत भरून घ्या. तयार आहे हेअर फॉल कंट्रोल ऑईल. हे तेल केसांना आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता. ज्यामुळे केसांचे गळणं कमी होतं. केस वाढवण्यास मदत होते आणि केस दाट होतात.
कलौंजीच्या बीया
झंडू केअरच्या माहितीनुसार काळ्या कलौंजीच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात. खनिज, एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे हेअर फॉलिकल्ससाठी फायदेशीर ठरतात. या बीयांमधून स्काल्पला एंटी इंफ्लेमेटरी गुण मिळतात. याव्यतिरिक्त या बियांच्या वापरानं केसांना प्राकृतिक काळा रंग मिळतो (Ref). नियमित कलौंजीचा वापर केल्यास केस पांढर होत नाहीत. हे तेल हलकं गरम करून या तेलानं केसांची मालिश करा ज्यामुळे केस दाट, सुंदर राहण्यास मदत होईल.
मेथीचे दाणे
मेथीचे पिवळे दाणे केसांसाठी बरेच फायदेशीर ठरतात. या दाण्यांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी, एंटी फंगल गुण, फ्लेवेनॉई्ड्स असतात. ज्यामुळे स्काल्प इरिटेशन दूर होते. केसांमधील कोंडा कमी होतो आणि स्काल्प सुदिंग, हिलिंग गुणही मिळतात.
मोहोरीचे तेल
मोहोरीचं तेल तुम्ही केसांना वेगवेगळ्या पद्धतीनं लावू शकता. एक कप दह्यात एक कप मोहोरीच्या बियांचे तेल घालून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. खासकरून निर्जिव केसांमध्ये चमक येते. दही, मध, एलोवेरा, मोहोरीचं तेल मिसळून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क अर्ध्या ते एक तास केसांना लावल्यानंतर केस स्वच्छ धुवा.