Join us  

केस गळणं ८ दिवसांत कमी होईल- लसूणाचा करा खास उपयोग, केस होतील दाट- वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2024 4:17 PM

How To Use Lasun Or Garlic For Hair Growth: केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर आता इतर सगळे उपाय सोडा आणि हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to apply lasun for fast hair growth?)

ठळक मुद्देहा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे करा. काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन ते भराभर वाढायला लागतील. छान दाट होतील. 

केसांशी संबंधित तक्रारी आता खूप वाढल्या आहेत. त्यातही केस गळणे ही समस्या खूप जास्त लोकांमध्ये आढळून येते. केस गळणं खूप जास्त वाढल्यामुळे अनेक पुरुषांना कमी वयातच टक्कल पडत आहे. म्हणूनच आता केस गळणं कमी करण्यासाठी आणि त्यांची चांगली वाढ होण्यासाठी हा एक खास उपाय करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लसूणाचा वापर करायचा आहे (best home remedies to control hair loss). लसूणामध्ये असणारे काही पौष्टिक घटक केसांसाठी अतिशय फायद्याचे ठरतात (how to apply lasun for fast hair growth?). त्याचा आपल्या केसांच्या वाढीसाठी कसा उपयोग करून घ्यायचा ते पाहा...

 

केसांसाठी कसा करायचा लसूणाचा वापर?

केसांसाठी लसूण कशा पद्धतीने वापरावा याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ सौंदर्यतज्ज्ञांनी formulatedbycosmeticengineer या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एका एअरटाईट डब्यात किंवा बाटलीमध्ये साधारण १०० मिली पाणी घ्या. 

जाई- जुईचे गजरे नेहमीचेच..! आता गुलाब पाकळ्यांचा सुंदर- भरीव गजरा करा- बघा एकदम सोपी पद्धत

त्यानंतर लसूणाची एक पाकळी घ्या आणि ती थोडीशी ठेचून बाटलीमधल्या पाण्यात टाका आणि लगेचच बाटलीचं झाकण लावून ठेवा.

लसूणामध्ये ॲलिसीन नावाचा घटक असतो तो केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. ॲलिसिन हवेत लगेच उडून जातं. त्यामुळे लसूण ठेचल्यानंतर तो लगेचच पाण्यात टाकावा. तसेच तो पाण्यात टाकल्यानंतर बाटलीचं झाकण लगेचच लावून घ्यावं.

 

यानंतर ही बाटली २ दिवस घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला थेट सुर्यप्रकाश लागणार नाही.

दोन दिवसांनंतर बाटलीतलं पाणी गाळून घ्या आणि ते केसांच्या मुळाशी लावा.

राखीपौर्णिमा 2024: लाडक्या भावासाठी एकदम हटके राखी घ्यायची? बघा कस्टमाईज राख्यांचे ७ सुंदर प्रकार

यानंतर साधारण २ ते ३ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. हा उपाय केल्यानंतर तुमच्या केसांमध्ये तुम्हाला लगेचच थोडातरी चांगला परिणाम झालेला निश्चित जाणवेल.

हा उपाय आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे करा. काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन ते भराभर वाढायला लागतील. छान दाट होतील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी