Lemon Juice to Remove Dark Spots : लिंबू आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. सोबतच लिंबू त्वचेची काळजी घेण्यासाठीही वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड भरपूर असतं. ते त्वचेसाठी फायदेशीर असतं. सायट्रिक अॅसिडमुळे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत मिळते. तर व्हिटॅमिन सी मुळे त्वचेचा रंग खुलतो. तसेच लिंबामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात, जे पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स दूर करण्यास मदत करतात. लिंबाचा वापर त्वचेवर केल्यास त्वचेतून एक्स्ट्रा सीबमचं उत्पादन होतं. फक्त लिंबू त्वचेवर लावणं टाळलं पाहिजे. लिंबासोबत काही गोष्टी मिक्स करून त्वचेवर लावल्या जाऊ शकतात. अशात जाणून घेऊ चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी लिंबामध्ये कोणत्या गोष्टी मिक्स कराव्यात.
१) लिंबू आणि दही
जर तुम्ही चेहऱ्यावरील डागांमुळे चिंतेत असाल, तर लिंबामध्ये दह्याचा वापर करून लावू शकता. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड आणि दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं. जे डाग दूर करण्यास मदत करतात. यासाठी २ चमचे दह्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस टाकावा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या. काही रोज हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी झाल्याचं दिसेल.
२) लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाचं मिश्रणंही चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी प्रभावी ठरतं. मधात मॉइश्चरायजिंग गुण असतात, जे त्वचेमध्ये ओलावा कायम ठेवतात. लिंबामधील सायट्रिक अॅसिड काळे डाग दूर करण्यास मदत करतं. हे मिश्रणं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावू शकता. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर मध चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
३) लिंबू आणि कोरफड
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात कोरफडीचा गर मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. कोरफडीनं त्वचे मॉइश्चराइज होते आणि हायड्रेट राहते. कोरफडीमधील गुण त्वचेवरील डाग दूर करण्यास फायदेशीर असतात. जर तुम्ही रोज कोरफडीचा गर लिंबाच्या रसात मिक्स करून चेहऱ्यावर लावाला तर चेहरा उजळेल, ग्लोइंग होईल आणि डागही कमी होतील. कोरफडीमुळं त्वचेची जळजळ आणि इरिटेशनही शांत होते.
४) लिंबू आणि गुलाब जल
लिंबाच्या रसामध्ये गुलाब जल मिक्स करूनही चेहऱ्यावर लावू शकता. गुलाब जलमुळे त्वचेची पीएच लेव्हल बॅलन्स राहते. यानं त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. लिंबाच्या रसात गुलाब जल मिक्स करून लावल्यास त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्यावरील डागही कमी होतात.