हिवाळ्यात त्वचा ड्राय होणे ही अगदी सगळ्यांना सतावणारी कॉमन समस्या आहे. वातावरणातील वाढत्या गारव्यामुळे त्वचेला कोरडेपणा वाढत जातो. त्वचेच्या कोरडेपणाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या अधिक वाढते. त्वचेच्या ड्रायनेसमुळे हिवाळ्यात चेहरा अधिकच खराब दिसतो. ऐन कडाक्याच्या थंडीत चेहरा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो करणं खूपच गरजेचं असत. थंड वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा परिणाम दिसून येतो. त्वचेच्या कोरडेपणामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो, त्याचवेळी कोरडेपणामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा अशा इतरही समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करुन त्वचा मऊमुलायम, चमकदार करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो(Easy Honey & Malai Face Packs To Hydrate & Protect Your Skin This Winter).
विविध प्रकारच्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर आणि घरगुती उपायही करुन पाहतो. स्किनकेअरसाठी घरगुती उपायच बरेचसे फायदेशीर असतातच, शिवाय त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर आपण बहुतेकवेळा दुधाची जाड साय लावतो, हा कॉमन उपाय आतापर्यंत सगळ्यांनीच एकदा तरी केला असेल परंतु या सायीत आणखी एक खास पदार्थ मिसळल्यास त्वचेचा ड्रायनेस कमी होऊन थंडीतेही त्वचेवर गुलाबी चमक येते, हा घरगुती नैसर्गिक पदार्थ कोणता ते पाहूयात(How To Use Malai & Honey On Face Overnight Best Home Remedy For Dry Skin In Winter).
हिवाळ्यात दुधाच्या सायीत मिसळा...
कोरड्या, निर्जीव त्वचेमुळे चेहऱ्याची चमक तर कमी होतेच पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडल्यास त्वचेवर सुरकुत्यासुद्धा दिसू लागतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला नेहमी मॉइश्चराईज ठेवणे आवश्यक असते. हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या त्वचेवर आपण दुधाची साय लावू शकतो. त्वचेवर साय लावल्याने त्वचा लोण्यासारखी मऊ होईल. दुधाची साय त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करते परंतु दुधाच्या सायीसोबतच आपण सायीत मध देखील मिसळून लावू शकतो. मध आणि दुधाची साय मिसळून त्वचेला आतून पोषण आणि आर्द्रता मिळवून देण्यास फायदेशीर ठरतात. यामुळे हिवाळ्यात त्वचेवरील भेगा, सुरकुत्या लगेचच बऱ्या होतात आणि त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो. दुधाची साय लावल्याने त्वचेवर झटपट चमक येते आणि डागही दूर होतात, तसेच त्वचेचा रंगही उजळण्यास अधिक मदत होते.
चेहऱ्यावरची पुरळ कमी करण्यासाठी मलायका अरोराचा हा खास ‘देसी’ उपाय, ॲक्ने होईल कमी लवकर...
मध आणि दुधाची साय यांचा एकत्रित फेसपॅक तयार करण्यासाठी, एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि दुधाची साय एकत्रित मिसळून घ्यावी. त्यानंतर ब्रशच्या मदतीने हा तयार फेसपॅक त्वचेवर लावून घ्यावा. १५ ते २० मिनिटे हा फेसपॅक असाच त्वचेवर लावून ठेवून द्यावा त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. क्रिम आणि मध लावल्याने तुमची त्वचा काही दिवसातच खूप मऊ आणि चमकदार होईल. मध आणि दुधाच्या सायीचा हा फेसपॅक लावल्याने आपल्याला कोणतेही क्रिम, मॉइश्चरायझर किंवा लोशन लावण्याची गरज भासणार नाही.
मध आणि दुधाची साय लावण्याचे फायदे...
१. मध :- मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, जे त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात. जर त्वचा कोरडी पडली असेल तर मधाचा वापर करून त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता.
बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ...
२. दुधाची साय :- दुधाच्या सायीमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स, जसे की व्हिटॅमिन 'ए' आणि व्हिटॅमिन 'ई' वृद्धत्वाच्या लक्षणांना कमी करतात. यासोबतच त्वचेची लवचिकता वाढविण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी दुधाची साय लावणे फायदेशीर ठरते.