केसांचे आरोग्य राखण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरते. मेथी दाण्यांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन - सी, प्रोटीन, हे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यात मदत करते. याशिवाय मेथीच्या दाण्यात असणारे लोह हे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात. केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मेथी दाणे उपयुक्त ठरते. सध्या बऱ्याच जणांचे केस कमी वयात पांढरे होत चालले आहे. यामागे अनेक करणे आहेत (White Hair).
पण पांढऱ्या केसांवर केमिकल ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा मेथी दाण्यांचा वापर करून केसांना काळे करू शकता (Hair Care Tips). पण केसांना काळे करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा? हे आपल्याला ठाऊक आहे का?(How to use methi for hair growth and black hair).
केसांसाठी मेथी दाण्यांचे फायदे
मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना आतून पोषण देण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये लेसिथिन देखील आढळते, जे केसांना नवीन जीवनदान देते. केसांसाठी मेथी दाण्यांचा वापर केल्याने केस गळण्याचीही समस्या दूर होते. शिवाय यात अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्यास प्रतिबंध होते.
ना पेस्ट-ना खर्च, फक्त अर्धा टोमॅटो घ्या आणि मानेवर रगडा; मानेच्या काळेपणावर घरगुती उपाय
पांढऱ्या केसांवर मेथी दाण्यांचा वापर कसा करावा?
पांढऱ्या केसांवर नैसर्गिक उपाय म्हणून आपण मेथी दाण्यांचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये मोहरीचे तेल घ्या. गॅसवर बाऊल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर कडीपत्ता आणि मेथी दाणे घाला. मध्यम आचेवर ५ मिनिटांसाठी साहित्य शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा, व तयार तेल गाळून एका बाऊलमध्ये काढून घ्या.
उन्हात बाहेर पडताच स्किन टॅन होते? चेहराही काळवंडलाय? हळदीत मिसळा २ गोष्टी-सुंदर त्वचेचं सिक्रेट
केसांवर मेथी दाण्याचे तेल लावण्याची पद्धत
सर्वप्रथम, केस विंचरून घ्या. तयार तेल केसांवर लावून मसाज करा. ४ ते ५ तासानंतर केस माईल्ड शाम्पूने धुवून घ्या. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे केस मुळापासून काळे होतील.