आजकाल लोक मार्केटचे शॅम्पू, हेअरकलर, तेल यांचा वापर करत असल्यानं घरगुती उपायांना फारसं महत्व देत नाहीत. या उत्पादनांमुळे केसांना फायदे होतातच असं नाही पण नुकसानही होऊ शकतं. (How to use Moringa to promote hair growth) कमी वयात केस पिकणं हा प्रॉब्लेम अनेकांना जाणवतो. किचनमधले काही पदार्थ तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे बनवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. ( Amazing Moringa Benefits For Hair Growth And How To Use It)
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित जीवनशैली, शॅम्पू, हेअर कलरचा अति वापर यामुळे केस जास्त पांढरे होत जातात. जर तुम्हालाही पांढऱ्या केसांची समस्या असेल तर काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. काहीजण महिन्यातून २ ते ३ वेळा हेअर डाय वापरतात पण यामुळे त्यांचे केस जास्त पांढरे दिसायला सुरूवात होते. केमिकल्स केसांना नुकसान पोहोचवण्यास कारणीभूत ठरते.
केस काळे करण्याचे नैसर्गिक उपाय
१) शेवग्याची पाने नीट धुवून स्वच्छ करा. नंतर ते कोरडे करण्यासाठी ठेवा. आता एक काचेची बाटली घ्या आणि त्यात खोबरेल तेल घाला. आता त्यात ही पाने टाका आणि बंद करा. ही बाटली ३-४ दिवस उन्हात ठेवा. यानंतर हे तेल केसांच्या मुळांना लावून मसाज करा. हे तेल केसांच्या मुळांपासून शेवटपर्यंत लावून चांगले मसाज करा आणि रात्रभर केसांना लावून ठेवा. सकाळी आपले केस धुवा आणि स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी हे तेल आठवड्यातून दोनदा वापरा.
ना वॅक्स, ना थ्रेडींगची गरज; चेहऱ्यावरचे केस काढण्याचे ४ सोपे उपाय; क्लिन-ग्लोईंग दिसेल चेहरा
२) यामध्ये तुम्ही शेवग्याची पाने धुवून उन्हात चांगली वाळवा. सुकल्यानंतर पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळेल. ही पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि नंतर केसांना मसाज करा. रात्रभर तेल लावून ठेवा आणि सकाळी केस धुवा.
३) जास्वंदाचे फूल जितके सुंदर आणि सुंदर दिसते तितकेच ते आपल्या केसांसाठी फायदेशीर असते. याच्या वापराने केसांची वाढ होते व केस मजबूत होतात.केस काळे करण्यासाठी जास्वंदाच्या फुलं रात्री पाण्यात टाकून नंतर दुसऱ्या दिवशी या पाण्याने केस धुवावेत. जर तुम्ही मेहेंदी वापरत असाल तर तुम्ही त्यात शेवग्याची पावडर आणि मेहेंदी पावडरचे पाणी देखील मिसळू शकता.