Join us  

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 2:16 PM

How to Make Multani Mitti Face Pack (Multani mitti Kashi lavavi) : बाजारात जाऊन महागडे ब्लिच, फेशियल अशा ट्रिटमेंट्स  घेण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरीच मुल्तानी माती लावली तर त्वचेवर ग्लोईंग दिसेल.

चेहऱ्यावर पिंपल्स आणि एक्ने आल्यानंतर काळे डाग पडू लागतात. (Skin Care Tips) डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं येतात आणि लूक खराब होतो. क्रिम्सची मदत घेऊन मुल्तानी मातीचा फेस  पॅक लावू शकता. (How to Use Multani Mitti for Tan Removal) हा पॅक लावल्याने चेहरा क्लिन राहतो. डाग दूर होण्यास मदत होते. मुल्तानी मातीचा फेस पॅक लावल्याने  तुम्हाला जास्त ब्युटी प्रोडक्ट्स लावण्याची गरज भासणार नाही. (Multani mati che fayde in marathi)

हेल्थलाईनच्या माहितीनुसार मुल्तानी मातीचा वापर त्वचेवर केल्याने त्वचेतील एक्स्ट्रा तेल कमी होतं. एक्ने कमी होतात. त्वचेचा स्किन टोन अधिक ब्राईट होतो. याशिवाय पिग्मेंटेशन निघून जाण्यास मदत होते. बाजारात जाऊन महागडे ब्लिच, फेशियल अशा ट्रिटमेंट्स  घेण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरीच मुल्तानी माती लावली तर त्वचेवर ग्लोईंग दिसेल. (Multani Mitti Face Pack for Skin Whitening)

मुल्तानी मातीचा फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य (How to make Multani Mati Face Pack)

1) १ चमचा मुल्तानी माती

२) १ चमचा लिंबाचा रस

३) १ चमचा गुलाब पाणी

४) १ चमचा कच्चं दूध

मुल्तानी मातीचा फेस पॅक कसा बनवायचा? (Multani Mitti Face Pack at Home)

१) वरील सर्व पदार्थ एकजीव करून पेस्ट तयार करून घ्या. चेहऱ्यावर हा फेस पॅक लावण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवा. ब्रशच्या साहाय्याने ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० ते २० मिनिटं पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा नंतर पाण्याने चेहरा साफ करा.

कपाळावरचे केस जास्तच पांढरे दिसून येतात? रोज ५ पदार्थ खा, डाय न लावता काळेभोर होतील केस

आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास काही आठवड्यातच चांगला फरक दिसून येईल. मुल्तानी माती कोरडी त्वचा असलेल्यांसाठी योग्य ठरतेच असं नाही. मुल्तानी मातीचा फेस पॅक लावताना त्वचा शुष्क होऊ शकते. कच्च्या दूधात मिसळून मुल्तानी माती लावल्याने चेहऱ्याला बरेच फायदे मिळतात.

मुल्तानी माती त्वचेला लावण्याचे फायदे (Benefits of Multani Mitti)

मुल्तानी माती त्वचेवरील पोर्सना बंद करते याशिवाय त्वचा टाईटही करते.  त्वचेवर ग्लो येऊन त्वचा टोन आणि चमकदार होण्यासही मदत होते.  स्किन मऊ, मुलायम आणि चमकदारही दिसते. मुल्तानी माती, एक्नेसारख्या समस्यांनाही लांब ठेवते. ही माती गुलाब पाण्यात  मिसळून चेहऱ्याला लावल्याने ग्लो येण्यास मदत होते.

केसांची वाढ खुंटलीये-आहेत ते केसही गळतात? रोज ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

मुल्तानी माती नारळाच्या तेलात मिसळून त्वचेवर लावल्याने चेहऱ्याची शायनिंग परत येते. मुल्तानी मातीत नारळाचे तेल मिसळून १५ मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्याला लावून ठेवा. मुल्तानी माती आणि नारळाच्या तेलात एंटी इंफ्लामेटरी गुण असतात ज्यामुळे त्वचेवर सूज येत नाही त्वचा टाईटही राहते. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर एलर्जी होते त्यांनी मुल्तानी माती गुलाब पाण्यात मिसळूनच लावावी

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स