केसगळती रोखण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांची निगा राखणं गरजेचं आहे (Hair care). आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्याही वाढत चालल्या आहेत (Hair Massage). फक्त महिलाच नाही तर, पुरुषवर्गही त्रस्त आहेत. केसगळती रोखण्यासाठी आपण ब्यूटी ट्रिटमेण्ट घेतो (Hair Growth). पण यासाठी भरमसाठ पैसाही खर्च होतो.
काही लोक हेअर स्पा किंवा मसाज थेरेपीवर बरेच पैसे खर्च करतात. पण जर तरीही केस गळती थांबत नसेल तर, घरगुती तेल तयार करून पाहा. आपण मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. मोहरीच्या तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. जे स्काल्प क्लिन ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे केसांची योग्य वाढ होते. केस गळती रोखण्यासाठी मोहरीच्या तेलाचा नेमका वापर कसा करावा? पाहा(How to Use Mustard Oil For Hair & Know its Benefits).
लेकीला खांद्यावर घेऊन चालणारा रोहित आणि सोबत रितिका, वाचा रोहित - रीतिकाची खास लव्हस्टोरी
केस गळती रोखण्यासाठी घरात तयार करा तेल
मोहरीचे तेल
कांद्याचा रस
केसांना मोहरीचे तेल लावल्याने काय होते?
- मोहरीचे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते.
- केसांना मोहरीचे तेल लावल्याने, केस चमकदार दिसतात.
वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..
- हे नवीन केस वाढण्यास आणि योग्य पोषण प्रदान करण्यात मदत करते.
केसांना कांद्याचा रस लावल्याने काय होते?
- कांद्याच्या रसामध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असते, जे केस चमकदार आणि दाट होण्यास मदत करते.
- त्यात सल्फर असल्यामुळे केस पातळ होते नाही.
- कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक केसांना आर्द्रता प्रदान करण्यास मदत करतात.
हेअर ग्रोथसाठी घरात तयार करा तेल
- सर्वात आधी केसांच्या लांबीनुसार, एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या. त्यात कांद्याचा रस घालून मिक्स करा.
- मिक्स केल्यानंतर हाताच्या बोटांच्या मदतीने स्काल्पवर तेल लावा, आणि मसाज करा.
- आपण हे तेल केसांवर रात्रभर तसेच ठेऊ शकता. किंवा २ ते ३ तासानंतर केस शाम्पूने केस धुवू शकता.
- शाम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या.
- आपण हा उपाय आठवड्यातून दोनदा केसांवर वापरून पाहू शकता. यामुळे केसांची नैसर्गिक ग्रोथ होईल.