Join us  

केस विंचरताना घरभर पसरतात? राईच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून लावा, दाट-लांबसडक होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 4:36 PM

How to Use Mustard Oil For Hair : मेथीचे दाणे आणि मोहोरीचे तेल केसांत लावल्यानं केस लांबसडक-दाट दिसतात.

अनेकजण पूर्वीपासून केसांना मोहोरीचं तेल लावतात. (How to Grow Hair Faster) आजकाल पारंपारीक उपायांचा वापर खूप कमी प्रमाणात होताना दिसून येतो. केस गळणं थांबवण्यासाठी आणि केस पांढरे होऊ नयेत यासाठी कुठल्याही केमिकल्सयुक्त क्रिम्सच्या वापरापेक्षा नैसर्गिक उपायांचा वापर फायदेशीर ठरतो. (How to Use Mustard Oil For Hair Growth) मोहोरीच्या तेलात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. बीटा कॅरोटीन, सेलेनियम, जिंक आणि व्हिटामीन ई यांसारखे गुणधर्म असतात. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. (How to Use Mustard Oil For Hair)

स्वंयपाकाप्रमाणेच तुम्ही मोहोरीचे तेल केसांना लावू शकता. (Mustard Oil For Hairs) मोहोरीचे तेल केसांना लावल्यानं केस हायड्रेट राहतात आणि स्काल्पवर जमा झालेली घाण दूर होण्यासही मदत होते. नियमित हे तेल केसांना लावल्यानं  केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. पातळ केसांना दाट बनवण्यासाठी हे तेल फायदेशीर ठरते.  तुम्ही कंबरेपर्यंत लांब केस वाढवू शकता. 

कंबर दुखते, सतत थकवा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ व्हेज पदार्थ खा; तरतरी येईल-फिट राहाल

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार १ टेबलस्पून जोजोबा ऑईल, १ टेबलस्पून बदामाचे तेल, १ टेबलस्पून  राईचे तेल एकजीव करून  केसांच्या मुळांना लावा. ३० मिनिटासाठी केसांना तसंच लावून ठेवा. त्यानंतर स्टिमरने केसांची वाफ घ्या त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळेल. (Ref) राईच्या तेलात अनेक पोषक घटक करताते ते केसांना पोषण देतात.

केस दाट होण्यासाठी मोहोरीचे तेल

मोहोरीचे तेल कढीपत्त्यात मिसळून केसांना लावल्याने केस दाट होण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे मुळांना पोषण मिळते आणि नुकसान होत नाही. फ्रि रेडीकल्सही निर्माण होत नाहीत. कढीपत्त्यात मोहोरीचे तेल मिसळून केसांना लावा यामुळे केस दाट आणि लांब होतील.

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

याचा वापर करण्यासाठी मोहोरीचे तेल एका वाटीत घेऊन मंद आचेवर ठेवा. त्यात मूठभर कढीपत्ते घाला. कढीपत्ते शिजून काळे झाल्यानंतर गॅस बंद करा.  हे तेल २ ते ३ वेळा केसांना लावा. या तेलाने केस दाट आणि लांब होतात. स्काल्पमधून डँड्रफ कमी होतो आणि केसांना पूर्ण पोषण मिळते. 

मेथीचे दाणे आणि मोहोरीचे तेल केसांत लावल्यानं केस लांबसडक-दाट दिसतात. कोणत्याही एका भांड्यात तेल गरम करून तेव्हा मेथीचे दाणे शिजवा. तेल  शिजल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवा. या तेलाने मालिश केल्याने केसांची चांगली वाढ होईव.  मेथीतील आयुर्वेदीक गुण केस गळण्याची समस्या टाळण्यास फायदेशीर ठरतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी