Lokmat Sakhi >Beauty > केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर

केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर

How to use onion juice for hair : त्वचेवर फाईन लाईन्स येतात त्याचप्रमाणे वाढत्या वयात केसांच्याही समस्या उद्भवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:27 AM2023-07-17T11:27:21+5:302023-07-17T13:00:02+5:30

How to use onion juice for hair : त्वचेवर फाईन लाईन्स येतात त्याचप्रमाणे वाढत्या वयात केसांच्याही समस्या उद्भवतात.

How to use onion juice for hair : 3 Ways to use onion for hair Benefits of onion juice for hair | केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर

केस फार पातळ झाले? फक्त १ कांदा वापरून 'हा' सोपा उपाय करा- केसांची वाढ होईल भराभर

केस गळणं, वेळेआधीच पांढरे केस दिसणं या सामान्य समस्या आहेत.  लाईफस्टाईलमध्ये बदल, खाण्यपिण्याच्या चुकीच्या सवयी, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केस गळतात. (How to use onion juice for hair) त्वचेवर फाईन लाईन्स येतात त्याचप्रमाणे वाढत्या वयात केसांच्याही समस्या उद्भवतात. बाजारात अनेक केमिकल्सयुक्त उत्पादनं आहेत जी केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे वाढ खुंटते. हे टाळण्यासाठी घरगुती उपायांचा वापर करायला हवा. (Hair Care Tips) 

केसांना मजबूत बनवण्यासाठी नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही लांबसडक, काळे केस मिळवू शकता. केसांचा रंग आणि मजबूती टिकवून ठेवण्यासाठी मिनरल्स आणि पोषक त्वतांची आवश्यकात असते.  या घटकांच्या कमतरतेमुळे केस जास्त प्रमाणात गळू शकतात. यातील एंटी ऑक्सिडेंट्स केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. (How to get long hairs using home remedies)

व्हिटामीन ई

व्हिटामीन ई जेलचा वापर काही पदार्थांसह केल्यास लांबसडक- दाट केस मिळण्यास मदत होईल. व्हिटामी ई जेल वापरण्याची योग्य पद्धत पाहूया. कांद्यात आढळणारे पोषक तत्व केसांना मजबूती देण्यासह केसांच्या वाढीस साहाय्यक ठरतात. जेव्हा तुम्ही व्हिटामीन ई  कांद्याच्या रसात मिसळून केसांना लावता तेव्हा केसांची वाढ वेगानं होण्यास मदत होते आणि केस लांबसडक, दाट होतात.

दही

दही तब्येतीप्रमाणे  त्वचा आणि केसांसाठीही  गुणकारी ठरते. व्हिटामीन ई कॅप्सूल दह्यात मिसळून केसांवर २ तासांसाठी लावा. नंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क  लावा.  यामुळे केसांवर चांगला परीणाम दिसून येईल.

बदाम

केसांना मजबूत, काळे-दाट बनवण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल वापरू शकता. बदामाच्या तेलात व्हिटामीन ई जेल मिसळून  केसांवर लावा आणि व्यवस्थित मसाज करा. तेल रात्रभरासाठी केसांवर लावलेले राहू द्या. सकाळी उठलल्यानंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ वेळा हे तेल केसांना लावा. यामुळे  केसांची लांबी वाढण्यासह केस मजबूत राहतील. केस धुतल्यानंतर लगेचच विंचरणं टाळा. यामुळे केस जास्त गळू शकतात. केस पूर्ण सुकल्यानंतर केसांवर फणी फिरवा. 

Web Title: How to use onion juice for hair : 3 Ways to use onion for hair Benefits of onion juice for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.