केसांची समस्या (Hair Problems) सध्या वाढत चालली आहे. धूळ, माती, प्रदूषण, व केसांची योग्य निगा न राखल्यामुळे, केस अकाली पांढरे होणे, केसात कोंडा, केस गळणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आपण महागड्या प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करतो. पण काही प्रॉडक्ट्स फेल ठरतात तर, काही उपयुक्त ठरतात.
केसांवर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स लावण्यापेक्षा कांद्याच्या रसाचा होममेड उपाय करून पाहा. आपण अनेकांकडून ऐकलं असेल की, केसांवर कांद्याचा रस लावल्याने अनेक प्रॉब्लेम्स सुटतात. कांद्यामध्ये (Onion Juice) अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. मुख्य म्हणजे त्यात सल्फर मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. पण केसांवर कांद्याच्या रसाचा वापर कसा करावा?(How to use onion juice for hair).
केसांवर मेहेंदी लावली की लगेच फिकी पडते? पेस्ट तयार करताना मिसळा चिमुटभर हळद, मग बघा केसांवर चमक
केसांवर करा या २ पद्धतीने कांद्याच्या रसाचा वापर
उपाय पहिला
कांद्याचा रस आणि दही केसांसाठी फायदेशीर ठरते. यासाठी कांद्याच्या रसात दही मिसळून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांवर लावा. अर्धा तासानंतर केस पाण्याने धुवा. यामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील. कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते, जे केसांना पोषण देण्याचे काम करते. यामुळे केस अकाली पांढरी होत नाही. शिवाय दह्यामुळे स्काल्प क्लिन होते. इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
उपाय दुसरा
केसांवर एरंडेल तेल आणि कांद्याचा रस फायदेशीर ठरते. केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल खूप मदत करते. यासाठी कांद्याच्या रसात एरंडेल तेल व खोबरेल तेल घालून मिक्स करा. तयार तेल केसांवर लावा. व काही वेळानंतर केस शाम्पूने धुवा. हे तेल केसांच्या वाढीसाठी उत्तम ठरते. यामुळे केसांची गळती थांबते.