Join us  

थंडीत केसांत कोंडा वाढतो? कांद्याच्या रसात १ गोष्ट मिसळून लावा, केस गळणंही होईल बदं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 3:15 PM

How to Use Onion Juice for Hair Growth : केसातील कोंड्यामुळे हैराण झाला असाल तर, कांद्याच्या रसाचा एक सोपा असरदार उपाय करून पाहा, दिसेल फरक

थंडीचं आगमन होताच केसांच्या अनेक समस्या वाढतात. केसात कोंडा, केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या आता सामान्य वाटतात. या समस्या सामान्य जरी वाटत असल्या तरी, त्यावर उपाय अनेक आहेत. काही उपाय फेल तर काही उपाय उपयुक्त ठरतात. कोंडा ही केसांची सर्वात मोठी समस्या आहे.

केसात जर कोंडा वाढला तर, टाळूवर खाज सुटण्याची समस्या वाढते. यामुळे स्काल्प इन्फेक्शन देखील होऊ शकते. ज्यामुळे केस झपाट्याने गळू लागतात. यावर घरगुती पण असारदार उपाय म्हणून आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. केसांवर कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्याने कोंडा काही दिवसात नाहीसा होईल(How to Use Onion Juice for Hair Growth).

काखेतला काळेपणा वाढला, स्लिव्ह्जलेस ड्रेस घालता येत नाही? ५ रुपयांच्या तुरटीचे २ भन्नाट उपाय, त्वचा उजळेल

कोंड्यासाठी कांदा-लिंबाच्या रसाचा वापर

कांद्यात सल्फर असते, व सल्फर केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे हेअर पोर्स ओपन होतात, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होते. याच्या वापराने कोंडा तर निघून जातेच, शिवाय केस गळतीही होत नाही. तर लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड असते. जे कोंड्याची समस्या तर सोडवतेच, शिवाय स्काल्प क्लिन करते. ज्यामुळे केस गळती होत नाही.

केस गळतात, पांढरे होतात? तुमचीही केसांना तेल लावण्याची पद्धत चुकते का? पाहा तेल कधी, कसे आणि किती वेळा लावावे..

केसांवर कांदा-लिंबाच्या रसाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, कांदा बारीक करून त्याचा रस काढा. नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता केस विंचरून घ्या. तयार रस स्काल्प आणि केसांवर लावा, व हलक्या हातांनी १० मिनिटांसाठी मसाज करा. स्काल्पवर रस ४० ते ४५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. नंतर पाण्याने केस धुवून घ्या. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. असे केल्याने कोंड्याची समस्या सुटेल, शिवाय केसांची वाढही होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स