Join us  

केसांची वेणी दिसेल जाड, कांद्याचा करा हेअर सीरम, केसांची समस्या होईल छुमंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 5:44 PM

How to Use Onion Serum for Hair Growth उन्हाळ्यात केसांच्या समस्या वाढतात, त्यावर हा सोपा उपाय..

उन्हाळ्यात केस व त्वचेच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात. कडक ऊन आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी हानिकारक आहे. धूळ, माती, प्रदुषणामुळे केस खूप खराब होतात. केसात कोंडा, केस गळणे, केस कोरडे होणे, स्काल्पवर खाज सुटणे. अशा समस्येमुळे लोकं हैराण होतात. म्हणून घराबाहेर पडताना टोपी किंवा स्कार्फने डोकं झाकणं आवश्यक आहे.

केसांची योग्य निगा राखण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण महागड्या  प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा घरगुती साहित्यांचा वापर करून हेअर सीरम तयार करा. या सीरममुळे केसांच्या अनेक समस्या सुटतील. मुख्य म्हणजे स्काल्पमधील रक्ताभिसरण चांगले होते. यासह केस गळण्याची समस्येपासून सुटका होते, ज्यामुळे केस घनदाट दिसतात(How to Use Onion Serum for Hair Growth).

हेअर सीरम करण्यासाठी लागणारं साहित्य

१ लहान कांदा

४ चमचे चहापत्ती

केस गळतीने वैतागून रडकुंडीला आला असाल तर करा १ चमचा अळीवाचा सोपा उपाय, फायदेच फायदे

एक ग्लास पाणी

स्प्रे बॉटल

सर्वप्रथम, एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात चहापत्ती घालून मिक्स करा, व त्यावर काही मिनिटांसाठी झाकण ठेवा. आता कांदा सोलून त्याचे पातळ काप करा. कांद्याचे हे काप चहाच्या उकळत्या पाण्यात घालून मिक्स करा. आपण त्यात कांद्याची साल देखील घालू शकता.

काकडी-कोरफड आणि मुलतानी माती; उन्हाळ्यातला कोरडा निस्तेज चेहरा होईल फुलासारखा टवटवीत

आता १५ मिनिटे मंद आचेवर साहित्य शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या व स्प्रे बाटलीत काळजीपूर्वक भरून ठेवा. अशा प्रकारे हेअर सीरम तयार आहे. 

हेअर सीरमचे फायदे

सर्व वयोगटातील लोकं या हेअर सीरमचा वापर करू शकता. या हेअर सीरमचा वापर केल्याने केस निरोगी राहतात. या हेअर सीरमचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. या सीरममुळे केस घनदाट व काळेभोर दिसतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स