Lokmat Sakhi >Beauty > आठवड्यातून एकदा 'या' पद्धतीने चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा- पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन गायब..

आठवड्यातून एकदा 'या' पद्धतीने चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा- पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन गायब..

Use Of Potato Juice For Skin Brightning: चेहऱ्यासाठी जर योग्य पद्धतीने बटाट्याचा वापर केला तर ॲक्ने, पिगमेंटेशन, पिंपल्स (best home remedies to get rid of acne, pigmentation and tanning) असे बरेच त्रास कमी होऊन त्वचेवर छान ग्लो येऊ शकतो..(how to use potato for glowing skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 17:32 IST2025-02-12T15:33:30+5:302025-02-12T17:32:32+5:30

Use Of Potato Juice For Skin Brightning: चेहऱ्यासाठी जर योग्य पद्धतीने बटाट्याचा वापर केला तर ॲक्ने, पिगमेंटेशन, पिंपल्स (best home remedies to get rid of acne, pigmentation and tanning) असे बरेच त्रास कमी होऊन त्वचेवर छान ग्लो येऊ शकतो..(how to use potato for glowing skin?)

how to use potato for glowing skin, best home remedies to get rid of acne, pigmentation and tanning, use of potato juice for skin brightning | आठवड्यातून एकदा 'या' पद्धतीने चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा- पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन गायब..

आठवड्यातून एकदा 'या' पद्धतीने चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा- पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन गायब..

Highlightsबटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा उपयोग होतो.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्नसमारंभात आपण छान दिसावं म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने त्वचेची काळजी घेत असते. आता प्रत्येकीलाच वेळ काढून पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं. किंवा पार्लरमधे केल्या जाणाऱ्या महागड्या ट्रिटमेंट्सवर खूप जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसते. अशावेळी चेहऱ्यावर जर अगदी पार्लरसारखाच ग्लो पाहिजे असेल तर बटाट्याचा वापर (use of potato juice for skin brightning)  करून हे काही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करून पाहू शकता (how to use potato for glowing skin?). या उपायांमुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन तर जातीलच पण चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल.(best home remedies to get rid of acne, pigmentation and tanning) 

 

त्वचेसाठी बटाटा कसा उपयुक्त ठरतो?

१. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेचा पाेत सुधारण्यासाठी मदत करते.

२. बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी बटाट्याचा उपयोग होतो.

उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कसं? ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत 

३. बटाट्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेवरील पिगमेंटेशन, टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचेवर आलेले लालसर किंवा काळे डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

४. बटाट्यामध्ये असणारे काही हायड्रेटिंग एजंट त्वचा मॉईश्चराईज आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.

५. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे कमी करण्यासाठीही बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो.

 

बटाट्याचा वापर कसा करायचा?

१. बटाट्याची सालं काढून टाका आणि उरलेला बटाटा किसून त्याचा ताजा रस काढा. या रसामध्ये चिमूटभर हळद, लिंबाच्या रसाचे ८ ते १० थेंब आणि १ टेबलस्पून बेसन घाला. हा लेप आता त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने चोळून मालिश करा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावर खूप छान चमक येईल. आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता.

भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन B12 देणारे ४ शाकाहारी पदार्थ, डॉक्टर सांगतात औषधं घेण्यापेक्षा हे पदार्थ खा..

२. बटाट्याचा रस आणि काकडीचा रस मिळून चेहऱ्यावर लावा तसेच डोळ्यांभोवती लावा. टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचेवर आलेले लालसर- काळे डाग आणि डोळ्यांखालची काळी वर्तूळे कमी होतील. 

 

Web Title: how to use potato for glowing skin, best home remedies to get rid of acne, pigmentation and tanning, use of potato juice for skin brightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.