Lokmat Sakhi >Beauty > आंघोळ करण्यापूर्वी केसांना 'या' पद्धतीने लावा बटाट्याचा रस, केस वाढतील भराभर-मैत्रिणी विचारतील सिक्रेट

आंघोळ करण्यापूर्वी केसांना 'या' पद्धतीने लावा बटाट्याचा रस, केस वाढतील भराभर-मैत्रिणी विचारतील सिक्रेट

How To Use Potato Juice For Hair Growth? 1 easy trick : बटाट्याच्या रसामुळेही केसांची वाढ होऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 06:33 PM2024-09-25T18:33:15+5:302024-09-25T18:33:59+5:30

How To Use Potato Juice For Hair Growth? 1 easy trick : बटाट्याच्या रसामुळेही केसांची वाढ होऊ शकते

How To Use Potato Juice For Hair Growth? 1 easy trick | आंघोळ करण्यापूर्वी केसांना 'या' पद्धतीने लावा बटाट्याचा रस, केस वाढतील भराभर-मैत्रिणी विचारतील सिक्रेट

आंघोळ करण्यापूर्वी केसांना 'या' पद्धतीने लावा बटाट्याचा रस, केस वाढतील भराभर-मैत्रिणी विचारतील सिक्रेट

केस निरोगी (Hair Growth), मजबूत आणि घनदाट असावेत असं कोणाला नाही वाटत (Hair care tips). पण बदलती जीवनशैली आणि केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. धूळ, माती, प्रदूषण, ताणतणावामुळे केसांचे भरपूर नुकसान होते (Potato Juice). त्वचेप्रमाणे केसांचीही योग्य काळजी घ्यायला हवी (Hair loss). केसांची निगा राखताना कोणत्या चुका टाळायला हव्या? कोणत्या चुकांमुळे केसांचे नुकसान होते? असे प्रश्न आपल्याही मनात येत असतील.

केसांची वाढ खुंटली असेल तर, आपण ब्यूटी पार्लरमध्ये जातो. केमिकल रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केसांचे आणखीन नुकसान होते. पण यावर आपण घरगुती उपायही करून पाहू शकता. यासाठी बटाट्याचा हेअर मास्कचा वापर करून पाहा. बटाट्याच्या हेअर मास्कनेही केसांची गळती थांबते(How To Use Potato Juice For Hair Growth? 1 easy trick).

बटाट्याचा हेअर मास्क करण्यासाठी लागणारं साहित्य


बटाटा

कांदा

आलं

अभ्यास करत नाहीत म्हणून मुलांना ट्युशन लावता? ४ सोप्या टिप्स; शिकवणीची गरजच पडणार नाही

बदाम तेल

एरंडेल तेल

खोबरेल तेल

अशा पद्धतीने तयार करा बटाट्याचा हेअर मास्क

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरलेला बटाटा, कांदा, एक इंच आलं घालून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नका. अन्यथा पेस्ट अधिक पातळ होईल.

तमन्ना भाटिया म्हणते, वाईट दिवस-वाईट माणसं अनेक गोष्टी शिकवतात, आपण मात्र विसरु नये की..

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चमचाभर बदामाचे तेल, एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा एरंडेल तेल घालून सर्व साहित्य एकजीव करा. अशा प्रकारे बटाट्याचा हेअर मास्क वापरण्यासाठी रेडी.

आता केस विंचरून घ्या. तयार पेस्ट स्काल्पला लावा. ३० मिनिटांसाठी तसेच ठेवा. ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. बदाम, एरंडेल आणि खोबरेल तेलामुळे केसांची योग्य वाढ होईल. शिवाय बटाट्याच्या रसामुळे स्कॅल्पचे पीएच लेव्हल संतुलित ठेवण्यास मदत होईल. बटाट्यामधील पोषण तत्त्वांमुळे आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Web Title: How To Use Potato Juice For Hair Growth? 1 easy trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.