Join us  

पायांचे टॅनिंग घालवण्यासाठी तांदुळाच्या पिठात मिसळा ३ गोष्टी, स्वस्तात मस्त उपाय- पाय दिसतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 5:23 PM

How to Use Rice Flour to Remove Sun Tan : तांदुळाच्या पिठाने करा त्वचा अधिक चमकदार आणि घालवा टॅनिंग

सध्याच्या काळात वाढलेले प्रदूषण, धूळ आणि उन्हाच्या तडाख्यामुळे स्किन काळपट पडते. मुख्य म्हणजे हाथ आणि पायावरची स्किन टॅन होते. ज्यामुळे अनेक जणी शॉर्ट ड्रेस किंवा वनपीस घालायला टाळाटाळ करतात. पायांवरील टॅनिंग घालवण्यासाठी आपण बरेच पैसे करतो (Tanning Removal). पण पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरगुती उपायांनी देखील पायावरचे टॅनिंग घालवू शकता. यासाठी आपल्याला नवीन वस्तू विकत घेण्याची गरज नाही (Summer Tanning).

तांदुळाचे पीठ, एलोवेरा जेल, टूथपेस्ट यासह काही वस्तूंचा वापर करून पेस्ट तयार करू शकता (Skin Care Tips). या पेस्टमुळे काही मिनिटात टॅनिंग दूर होईल. यासह त्वचेवर नवीन चमक येईल(How to Use Rice Flour to Remove Sun Tan).

टॅनिंग रिमूव्हर पेस्ट तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचे पीठ

एलोवेरा जेल

टूथपेस्ट

लिंबाचा रस

पेस्ट तयार करण्याची योग्य पद्धत

रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

सर्वप्रथमम एका बाऊलमध्ये एक चमचा साखर, एक चमचा तांदुळाचे पीठ, एक चमचा एलोवेरा जेल, अर्धा चमचा टूथपेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून साहित्य मिक्स करा. जर पेस्ट जास्त जाडसर झाली असेल तर, आपण त्यात लिंबाचा रस मिक्स करू शकता. अशा प्रकारे  टॅनिंग रिमूव्हर पेस्ट तयार होईल.

टॅनिंग रिमूव्हर पेस्ट लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम, हात आणि पाय स्वच्छ धुवून घ्या, नंतर पुसून घ्या. त्वचेवर टॅनिंग रिमूव्हर पेस्ट लावा, व हाताने स्क्रब करा. ५ ते ६ मिनिटांसाठी पेस्ट त्वचेवर तशीच ठेवा. काही वेळानंतर पाण्याने पेस्ट धुवून काढा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. ज्यामुळे स्किन क्लिअर होईल, शिवाय टॅनिंगही दूर होईल.

लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

स्किनसाठी तांदुळाचे पीठ ठरते फायदेशीर

तांदुळाच्या पीठामध्ये अँटीऑक्सडंट गुण आढळतात. जे त्वचेला हानी पोहचविणाऱ्या विषारी पदार्थ, डार्क स्पॉट, अॅक्ने, यासह इतर बॅक्टेरियाला हटविण्यास मदत करते. ज्यामुळे स्किन क्लिन होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी