Join us  

चेहऱ्यावर काळे डाग-टॅनिंग वाढलं? तांदळाच्या पीठाचा टू इन वन फॉर्म्यूला; २ मिनिटांत चेहरा चमकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 8:37 AM

How to Use Rice Water For Face (Chehryavr Tej kase aanave) : तांदळाच्या पीठाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर टॅनिंग निघून जातं. एजिंग साईन्स कमी होतात सन डॅमेज कमी होतं.

तांदूळाच्या पीठाचा वापर अनेक पद्धतीने केला जातो त्वचा आणि केसांच्या दृष्टीनेही तांदळाच्या पीठाचे अनेक फायदे आहेत.   कोरियन ब्यूटी सिक्रेट्समध्ये तांदळाच्या पीठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चेहऱ्यावर तांदळाचे पीठ त्वचेवर लावल्याने त्वचेवर एंटी एजिंग इफेक्ट दिसून येतात. (How to Use Rice Water For Face and Hair) यामुळे त्वचेतील फ्री रॅडिकल्स दूर राहतात. (Rice water for glowing skin) सेंसिटिव्ह स्किनसाठी तांदळाचे पीठ फायदेशीर ठरू शकते सेंसिटिव्ह स्किनसाठीही तांदूळाचे पीठ फायदेशीर ठरते. तांदळाचे पीठ वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. त्वचा आणि स्किन ग्लोईंग राहण्यास मदत होते. (Benefits of Rice Water For Face)

तांदळाच्या पीठाचा फेस पॅक (Rice Face Pack)

तांदळाच्या पीठाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर टॅनिंग निघून जातं. एजिंग साईन्स कमी होतात सन डॅमेज कमी होतं.  त्वचेचं एक्सेस ऑईल कमी होते आणि एक्नेसुद्धा कमी होतात. पिंपल्स जास्त प्रमाणात येत नाहीत.  कोरडी, रूक्ष, डाग असलेल्या त्वचेवर तुम्ही हे पीठ लावू शकता.

एका वाटीत  तांदूळाचे पीठ, टोमॅटो रस, बेसन मिसळून त्वचेवर लावा.  या तिन्ही वस्तू 1 -1 चमचा मिसळून याची पेस्ट मिसळून चेहरा आणि मानेला लावा.  कमीत कमी 15 ते 20 मिनिटं चेहऱ्याला लावा नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. यामुळे त्वचेवर चांगला ग्लो येईल.

सकाळी चालता तरी पोट जसच्या तसंच? डॉक्टर सांगतात वॉकनंतर ५ गोष्टी करा-लवकर स्लिम व्हाल

तेलकट त्वचेसाठी फायदेशीर (korean Beauty Secrets)

स्किन गरजेपेक्षा जास्त तेलकट असेल तर तांदळाच्या पीठात एलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवा आणि 20 मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करेल. यामुळे त्वचेचं टेक्सचरही मऊ होईल.

डाग कमी होतात

चेहऱ्यावर जर डाग दिसून येत असतील तर १ चमचा तांदूळाचे पीठ, १ चमचा ओट्स आणि १ चमचा दूध आणि १ चमचा मध ही पेस्ट तयार करा.  हा फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी