Join us  

केस खूप पातळ झाले- वाढतही नाहीत? तांदळाच्या पाण्याचा ‘असा’ करा वापर, महिनाभरातच होतील लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 12:48 PM

How To Use Rice Water For Fast Hair Growth: केस खूप पातळ झाले असतील किंवा केसांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तांदळाच्या पाण्याचा म्हणजेच राईस वॉटरचा हा एक साेपा उपाय करून पाहा.. 

ठळक मुद्देजर ते काही उपाय नियमितपणे केले तर अगदी महिना भरातच केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. केस छान वाढतील, तसेच केसांमधला कोंडा कमी होईल

हल्ली केसांशी संबंधित तक्रारी खूपच वाढल्या आहेत. काही जणांचे केस खूप गळतात, तर काही जणांच्या केसांना अजिबात वाढच नसते. केसांत वारंवार होणारा कोंडा किंवा कमी वयातच केस पांढरे होणं या समस्या तर बहुतांश लोकांना छळत आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण हेच आहे की केसांना पुरेसं पोषण मिळत नाहीये. हे पोषण देण्याचं काम राईस वॉटर किंवा तांदळाचं पाणी खूप छान पद्धतीने करतं (how to use rice water for fast hair growth). केस आणि त्वचा यांच्यासाठी तांदळाचं पाणी वापरण्याचं कोरियन ब्यूटी सिक्रेट आता जगभरातच प्रसिद्ध होत आहे (rice water remedies for reducing hair loss). कारण त्याचे फायदेच तेवढे जबरदस्त आहेत. म्हणूनच केसांसंबंधी सगळ्या समस्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कसा उपयोग करायचा ते पाहा...(use of rice water for thick hair)

 

केसांसाठी कसा करायचा राईस वॉटरचा उपयोग?

केसांच्या सगळ्याच समस्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कशा पद्धतीने उपाय करायचा याविषयीची माहिती rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

पाठदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा कायमचा जाईल! ५ प्रकारच्या बिया रोज खा- तब्येत राहील ठणठणीत

यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही जर ते काही उपाय नियमितपणे केले तर अगदी महिना भरातच केसांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. केस छान वाढतील, तसेच केसांमधला कोंडा कमी होईल, केसांवर छान चमक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं गळणं कमी होईल.

त्यासाठी तुम्ही राईस वॉटर एक स्प्रे बॉटलमध्ये करून ठेवा आणि रोज रात्री झोपण्यापुर्वी केसांच्या मुळांशी शिंपडा. यामुळे केस वाढतील.

 

दुसरा उपाय म्हणजे एका वाटीत राईस वॉटर घ्या आणि त्यामध्ये केस धुण्यासाठी तुम्ही जो शाम्पू वापरता तो टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवा आणि त्याने केस धुवा.

तिसरा उपाय असा सांगितला आहे की केसांना शाम्पू केल्यानंतर ते धुण्यासाठी राईस वाॅटर वापरा.

केसांना लावा तुमचं स्वत:चं नाव लिहिलेली हेअरक्लिप, बघा कस्टमाईज हेअरक्लिप्सचा भन्नाट ट्रेण्ड

चौधा उपाय म्हणजे एका मोठ्या भांड्यात तांदळाचं पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये काही वेळ केस बुडवून ठेवा.

पाचवा उपाय करण्यासाठी एका वाटीत राईस वॉटर, खोबरेल तेल आणि दही घेऊन व्यवस्थित कालवा. या मिश्रणाने आता केसांना मालिश करा आणि अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी