Join us  

केस लांबसडक हवेत? तांदळाच्या पाण्याने करा हेअर वॉश, केस होतील मुलायम- मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2023 2:28 PM

How To Use Rice Water For Hair Growth : घरच्या घरी सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो...

ठळक मुद्देकेस वाढावेत यासाठी पार्लरचे महागडे उपचार करण्यापेक्षा घरच्या घरी करा सोपा उपायतांदूळ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतात त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त असतात

आपले केस सुंदर, लांबसडक असावेत असं प्रत्येकीला वाटतं. मात्र अनेकदा प्रदूषण, आहारातून मिळणारे अपुरे पोषण, प्रमाणापेक्षा जास्त केमिकल्सचा वापर यांमुळे आपल्या केसांचा पोत बिघडतो. मग केस वाढावेत यासाठी आपण बाजारात मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा शाम्पू यांचा वापर करतो. मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. तांदूळ हा आपल्या आहारातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असून आपण सगळेच आवडीने भात खातो. पण हाच तांदूळ सौंदर्यासाठीही अतिशय फायदेशीर असतो असे आपल्याला कोणी सांगितले तर कदाचित आपला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र तांदळाचे पाणी त्वचेसाठी आणि केसांसाठीही अतिशय फायदेशीर असते. पाहूयात तांदळाच्या पाण्याचा केस धुण्यासाठी नेमका कसा वापर करायचा (How To Use Rice Water For Hair Growth). 

१. तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेटस, अमिनो अॅसिड असते. यामुळे केसांची शाईन वाढण्याबरोबरच केस मजबूत होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. 

(Image : Google)

२. वाटीभर तांदूळ घेऊन त्यामध्ये २ ते ३ भांडी पाणी घाला. अर्धा तास हे तांदूळ असेच भिजत ठेवाा. म्हणजे पाण्यामध्ये तांदळाचा अर्क उतरतो. त्यानंतर हे तांदूळ गाळून एका स्वच्छ बाऊलमध्ये पाणी वेगळे करुन घ्यावे. 

३. सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे शाम्पू आणि कंडीशनर लावून केस धुतो, त्याप्रमाणे केस स्वच्छ धुवून घ्यावेत. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. 

४. केस ओले असतानाच बाऊलमध्ये असलेले तांदळाचे पाणी केसांच्या मुळांशी लावावे. त्यानंतर संपूर्ण केसांना हे पाणी लावावे आणि २० ते ३० मिनीटे हे पाणी केसांवर तसेच ठेवावे.

(Image : Google)

५. केसांवर काही वेळ पाणी ठेवल्याने कार्बोहायड्रेटस आणि अँटीऑक्सिडंटस यांचा केसांवर एकप्रकारचा कोट तयार होतो आणि केसांचा पोत चांगला होण्यास मदत होते. यामुळे खराब झालेले केस रिपेअर होण्यास मदत होते आणि केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. 

६. गार किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत आणि त्यानंतर कोरडे करुन केसांमध्ये झालेला गुंता काढावा. याचा केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी