Join us  

केस खूपच गळतात? कपभर तांदळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांवर लावा; दाट, लांब होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 7:49 PM

How to Use Rice Water For Hairs : या उपायामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केस गळणंही थांबेल.

चीन आणि जपानमधील महिलांकडून पूर्वापार केसांच्या वाढीसाठी आणि केसांना मजबूत बनवण्यासाठी तांदूळाच्या पाण्याचा वापर केला जातो. केस पांढरे होणं रोखण्यासाठीही तांदळाच्या पाण्याचा वापर केला दातो. यात अनेक महत्वपूर्ण गुण असतात.  जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. (Rice Water Benefits)

केस गळणं थांबवण्याासाठी त्यात तांदळाचे पाणी घ्या. (Hair Fall Tips) त्यात २ ते ३ नारळाचे तेल घाला. एकत्र करून स्काल्पवर लावा. केस गळणार नाही याची खात्री करा. स्काल्पला हे पाणी लावून व्यवस्थित लावून धूवून टाका. या उपायामुळे केसांची चांगली वाढ होईल आणि केस गळणंही थांबेल. (5 Proven Benefits of Rice Water For Hairs) 

सायंस डायरेक्टच्या रिपोर्टनुसार तांदूळाच्या पाण्यात ७५ ते ८० टक्के स्टार्च असते. स्टार्च  तांदूळ भिजवल्यानंतर आणि शिजवल्यानंतर बाहेर येतं. यात अनेक महत्वपूर्ण व्हिटामीन्स  आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे केस मजबूत राहतात. यात अमिनो एसिड्, बी  व्हिटामीन, व्हिटामीन ई, एंटी ऑक्सिडेंट्स, मॅग्नेशियम, फायबर्स, जिंक अशी पोषक तत्व असतात.

संशोधन काय सांगते?

विलेय ऑनलाईन लायब्रेरीद्वारे प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार तांदूळाच्या पाण्याने सरफेस फ्रिक्शन कमी होते.  इलास्टिसिटी मेंटेन राहण्यास मदत होते.  (Ref) डर्मेटोलॉजी एंटी थेरेपीद्वारे  २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे केस गळायला सुरूवात होते.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

तांदूळाच्या पाण्यातील पोषक तत्व केसांना मजबूत प्रदान करतात. ज्यामुळे केस मजबूत होतात. तांदूळाच्या पाण्यात इनोसिटोन असते. जे एक कार्बोहायड्रेट आहे. ज्यामुळे हेअर डॅमेज रिपेअर करता येते आणि हेअर ग्रोथ होण्यास मदत होते.

अभिनेत्री भाग्यश्रीचे एक से एक ब्लाऊज पॅटर्न्स; नव्या साड्यांवर शिवा आकर्षक ब्लाऊज डिजाईन्स, पाहा

तांदूळाचे  पाणी केसांवर कसे वापरावे? (How to  Use Rice Water For Hairs)

सगळ्यात आधी शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर केस स्वच्छ करा, नंतर  तांदूळाच्या पाण्यात बुडवा, तांदूळाच्या पाण्याने स्काल्पची मसाज करा, २० ते २५ मिनिटं तसंच ठेवा.  हलक्या कोमट पाण्याने केस धुवून घ्या.  तांदूळाच्या पाण्याचा वापर तुम्ही केसांसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी