आपल्या रोजच्या कामाच्या गडबडीत केसांची काळजी घ्यायला आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मग बऱ्याचदा केस कोरडे होतात. त्यांच्यावरची चमक गेल्यासारखी वाटते. हाताने केसांना स्पर्श केल्यास ते अगदीच राठ वाटू लागतात. तुमचेही केस असेच झाले असतील तर केसांवर इतर कोणतेही कॉस्मेटीक्स ट्राय करण्यापेक्षा तांदळाच्या पाण्याचे हे काही घरगुती उपाय करून बघा (how to use rice water for healthy and shiny hair?). केसांना नक्कीच खूप चांगला फायदा होईल. (how to get rid of dry and rough hair?)
केसांसाठी कसं वापरायचं राईस वॉटर?
केसांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तांदळाच्या पाण्याचा म्हणजेच राईस वॉटरचा उपयोग कसा करायचा याविषयीच्या काही टिप्स rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या आहेत.
रोपांना ताक घालण्याची याेग्य पद्धत कोणती? त्यात चूक केल्यास फुलण्याऐवजी कोमेजून जाईल बाग
यामध्ये असं सांगितलं आहे की तुमचे केस जर खूप ड्राय झाले असतील तर शाम्पू केल्यानंतर केसांवर १ कप तांदळाचे पाणी टाका आणि ते सगळ्या केसांना व्यवस्थित लावा. त्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुऊन टाका. केस मऊ झाल्यासारखे जाणवतील.
केसांचा कोरडेपणा घालविण्यासाठी केस धुतल्यानंतर २ चमचे राईस वॉटर आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल केसांवर स्प्रे करा आणि त्यानंतर केस विंचरा. केसांवर छान चमक येईल.
टीनएजर्स होण्यापुर्वी मुलांना शिकवायलाच पाहिजेत 'या' गोष्टी; अभ्यासात पुढे जातील- गुणवान होतील
तांदळाचं पाणी्, बदाम तेल आणि एलोवेरा जेल हे ३ पदार्थ एकत्र करा. शाम्पू केल्यानंतर या ३ पदार्थांचे मिश्रण तुम्ही केसांना कंडिशनर म्हणून लावू शकता. हे मिश्रण केसांना लावल्यानंतर ७ ते ८ मिनिटांनी केस धुवून टाका. केसांवर छान चमक येऊन ते मऊ होतील.
शाम्पू करताना १ ग्लास राईस वॉटरमध्ये तुमचा नेहमीचा शाम्पू टाका. त्याचा फेस करा आणि त्याने केस धुवा. केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.