Lokmat Sakhi >Beauty > कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

How To Use Saffron To Cure Dark Circles : Saffron Remedy For Dark Circles : Natural Remedies To Remove Dark Circles : How to use saffron to cure dark circles at home : केशर वापरुन डोळ्यांखालील जुनाट,हट्टी डार्क सर्कल्स घालावा काही दिवसांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2025 19:32 IST2025-01-27T19:21:24+5:302025-01-27T19:32:05+5:30

How To Use Saffron To Cure Dark Circles : Saffron Remedy For Dark Circles : Natural Remedies To Remove Dark Circles : How to use saffron to cure dark circles at home : केशर वापरुन डोळ्यांखालील जुनाट,हट्टी डार्क सर्कल्स घालावा काही दिवसांत...

How to use saffron to cure dark circles at home How To Use Saffron To Cure Dark Circles Saffron Remedy For Dark Circles | कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...

सुंदर, नाजूक, रेखीव डोळ्यांखालील डार्क सर्कल्स आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी करतात. असे हे गडद डार्क सर्कल्स कुणालाही आवडत नाहीत. परंतु हे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स इतके जुनाट (How To Use Saffron To Cure Dark Circles) आणि हट्टी असतात की अनेक उपाय केले तरीही जायचं नावच घेत नाही. कालांतराने हे डार्क सर्कल्स अधिकच गडद होत जातात ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य पूर्णपणे हरवून जाते. काहीवेळा आपण हे डोळ्यांखालील गडद डार्क सर्कल्स (How to use saffron to cure dark circles at home) मेकअपच्या मदतीने  लपवतो. परंतु असे किती दिवस आपण मेकअपच्या मदतीने डार्क सर्कल्स लपवणार, यावर काहीतरी ठोस आणि असरदार उपाय करणे आवश्यक असते(Saffron Remedy For Dark Circles).

काहीवेळा हे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. तरीसुद्धा डोळ्यांखालील काळेपणा निघून जात नाही. यासाठीच डोळ्यांखाली डार्क सर्कल्स घालवण्यासाठी आपण आजीबाईच्या बटव्यातील एका खास आयुर्वेदिक औषधी पदार्थाचा वापर करणार आहोत. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कितीही वर्षापूर्वीचे जुनाट असतील तरीही ते अगदी सहजपणे निघून जातील. RVMUA अकादमीच्या संस्थापक, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्सपर्ट रिया वशिष्ठ यांनी डोळ्यांखाली डार्क सर्कल्स घालण्यासाठी केशरचा वापर कोणत्या ३ पद्धतींनी करावा याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. 

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी केशर कसे वापरावे ?  

१. केशर आणि बदाम तेल :- डोळ्यांखालील डार्क सर्कलची समस्या कमी करण्यासाठी केशर आणि बदामाचे तेल एकत्रित मिक्स करुन वापरले जाऊ शकते.  बदामाच्या तेलात व्हिटॅमिन 'ई' मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करते. एक चमचा बदामाच्या तेलात केशराचे धागे रात्रभर भिजवत ठेवा. सकाळी हे तेल डोळ्यांखाली लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय रोज करून पहा. तुम्हांला काही दिवसातच चांगला  परिणाम दिसू लागेल. 

करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

२. केशर आणि ऐलोवेरा जेल :- ऐलोवेरा जेल तुमच्या त्वचेला शांत आणि मॉइश्चराइज करते, तर केशर पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. यासाठी केशर आणि ऐलोवेरा जेल एकत्रित मिसळून डार्क सर्कल्सवर लावल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात. सर्वप्रथम, एक चमचा ऐलोवेरा जेल घेऊन त्यात केशर घाला आणि मिक्स करा. सुमारे १५ मिनिटे हे मिश्रण भिजवून ठेवा आणि डोळ्यांखाली लावा. आता हलक्या हाताने मसाज करा. आपण हे तयार मिश्रण डोळ्यांखाली २० मिनिटे किंवा रात्रभर देखील ठेवू शकता. हा उपाय केल्याने डोळ्यांखालील गडद डार्क सर्कल्स कमी होतात. 

चमचाभर गव्हाचे पीठ, पायांच्या भेगा - काळपटपणा छूमंतर! घ्या उपाय, वाटेल आधीच का नाही केला...

३. केशर आइस क्यूब :- कोल्ड केशर आइस क्यूबमुळे डोळ्यांखालील त्वचेची सूज कमी होते तसेच वयोमानानुसार लूज पडलेली त्वचा टाईट होते. त्याचबरोबर गुलाबपाणी त्वचेला तजेलदारपणा येतो आणि केशर ब्लड सर्क्युलेशन वाढवते. त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात. गुलाब पाण्यात १० ते १५ केशरचे धागे घाला  आणि रात्रभर भिजवा. आता हे मिश्रण आईस क्यूब ट्रेमध्ये ओतून फ्रिजरमध्ये ठेवून गोठवा. थोड्या वेळाने आपला केशर आइस क्यूब वापरण्यासाठी तयार असेल. त्यानंतर काही सेकंदांसाठी डोळ्यांखाली केशरयुक्त बर्फाचे तुकडे हलक्या हाताने डोळ्यांभोवती फिरवा. हा उपाय रोज सकाळी झोपेतून उठल्यावर केल्यास आपल्या डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात.

Web Title: How to use saffron to cure dark circles at home How To Use Saffron To Cure Dark Circles Saffron Remedy For Dark Circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.