Join us  

केस धुताना शॅम्पूमध्ये मिसळा 'हा' पदार्थ; केस कायम राहतील दाट, वाढ होईल चांगली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:00 AM

How to Use Shampoo For Hair Growth : एंटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे कढीपत्ता कोंडा दूर करण्यासही फायदेशीर ठरतो. कढीपत्ता दह्यासह मिसळून लावल्यानं  केसांतील कोंडा कमी होतो.

प्रदूषण, स्वच्छतेचा अभाव, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं, व्यायाम न करणं यामुळे केस गळण्याची समस्या वाढत चालली आहे. तरूणांपासून वृद्धांपर्यत सर्वांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. केसांचं गळणं थांबवण्यासाठी अनेकजण महागडा हेअर स्पा करतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, तात्पुरता परीणाम दिसल्यानंतर केस पुन्हा खराब दिसायला सुरूवात होते. केसांना  पोषण मिळण्यासाठी  आहारातील काही पदार्थांचा समावेश केल्यास चांगले परीणाम दिसून येतील. (How To Use Curry Leaves For Hair Growth)

हा उपाय करण्यासाठी एका सगळ्यात आधी एक वाटीत कढीपत्ता, १ चमचा तांदळाचे दाणे, पाण्यासह मिसळा. हे पाणी काही तासांसाठी झाकून ठेवून द्या.  झाकण उघडल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि कढीपत्ता आणि तांदूळ पाण्यापासून वेगळे करा. या पाण्यात माईल्ड शॅम्पू घाला. शॅम्पू घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. नंतर हे पाण्यानं केस स्वच्छ धुवा. (Curry leaves for hair benefits)

आठवड्यातून दोनवेळा हा उपाय केल्यास चांगला परीणाम दिसून येईल. तांदळाचं पाणी आणि कढीपत्त्यातील गुणधर्म केसांसाठी फायदेशीर ठरतात.  यामुळे केस वाढण्यास मदत होते आणि सतत केस गळणं कमी होतं आणि मूळही मजबूत राहतात. (Benefits of Curry Leaves for Hair Growth)

कढीपत्त्याचे केसांना फायदे

कढीपत्त्यात एंटीमायक्रोबियल  गुणधर्म असतात. या पानांमुळे बॅक्टेरीया कमी होऊन इंन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. (Hair Growth) याशिवाय कढीपत्ते (Curry Leaves) , आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरेस आणि व्हिटामीन बी, सी चा चांगला स्त्रोत आह.  एक नाही तर केसांच्या  बऱ्याच समस्या कढीपत्त्यानं दूर होतात.

केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता गुणकारी ठरतो. यामुळे हेअर फॉलिकल्स ओपन होतात. आणि स्काल्पला श्वास घेण्यास वाव असतो.  हेअर ग्रोथसाठी कढी पत्त्यात मेथी आणि आवळा एकत्र करा. मुठभर कढीपत्त्यामध्ये मेथीची पानं मिसळून, एक आवळा त्यात बारीक पेस्ट करून घाला. हवंतर तुम्ही आवळा पावडरही वापरू शकता.  आवळा दळण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा पाणी मिसळू शकता. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासानं  केस स्वच्छ धुवून घ्या.

पोट साफ नसतं, मल बाहेर निघत नाही; जेवताना चमचाभर तूपाचा हा उपाय करा, पोट होईल साफ

एंटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे कढीपत्ता कोंडा दूर करण्यासही फायदेशीर ठरतो. कढीपत्ता दह्यासह मिसळून लावल्यानं  केसांतील कोंडा कमी होतो. सगळ्यात आधी १५ ते २० कढीपत्त्याची पानं  २ चमचे दह्यात मिसळा आणि १५  मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स