Lokmat Sakhi >Beauty > केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...

केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...

How to use shikakai for hair : 3 different ways to use it in your hair care routine : केसांच्या अनेक समस्या दूर करुन मजबूत, लांब आणि चमकदार केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा हे पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 07:56 AM2024-07-26T07:56:39+5:302024-07-26T08:08:21+5:30

How to use shikakai for hair : 3 different ways to use it in your hair care routine : केसांच्या अनेक समस्या दूर करुन मजबूत, लांब आणि चमकदार केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा हे पाहूयात.

How To Use Shikakai For Hair Growth 3 different ways to use Shikakai in your hair care routine | केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...

केसांसाठी शिकेकाई वापरण्याच्या ३ सोप्या पद्धती, केस होतील मजबूत, घनदाट - केसांच्या समस्या होतील दूर...

केसांसाठी शिकेकाईचा वापर हा फार पूर्वीपासून होत आहे. आयुर्वेदानुसार शिकेकाईचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. शिकेकाईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी सारखे अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात  आणि केस मजबूत करतात. शिकेकाईमधील याच गुणधर्मामुळे शिकेकाईचा उपयोग केसांच्या अनेक प्रॉडक्ट्समध्ये केला जातो( how to use Shikakai for strong hair).

 केस घनदाट, मुलायम आणि काळे करण्यासाठी शिकाकाईचा वापर शतकानुशतके केला जात आहे. आपल्या आजी- आजोबांच्या काळापासून शिकेकाई केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आठवड्यातून किमान एकदा तरी शिकेकाईचा वापर केल्यास केसांना त्याचा खूप फायदा होतो. आजही अनेक आयुर्वेदिक शाम्पू आणि साबणांमध्ये शिककाईचा वापर केला जातो. घरच्या घरी शिकेकाईचा वापर नेमका कसा करावा हे आपल्याला माहित नसते. केसांची निगा राखण्यासाठी शिकेकाईचा वापर केल्याने आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो. केसांच्या अनेक समस्या दूर करुन मजबूत, लांब आणि चमकदार केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा हे पाहूयात. शिकेकाईचा हेअर मास्क, शाम्पू पावडर आणि तेल कसे बनवावे हे पाहूयात(3 different ways to use Shikakai in your hair care routine). 

केसांसाठी शिकेकाईचा वापर नेमका कसा करावा ? 

१. शिकेकाईचा हेअर मास्क... 

शिकेकाई हेअर मास्क बनवण्यासाठी प्रत्येकी ३ टेबलस्पून शिकेकाई पावडर, आवळा पावडर आणि रिठा पावडर घेऊन त्यात  २ ते ३ टेबलस्पून लिंबाचा रस आणि थोडे कोमट पाणी मिसळा. हा मास्क केसांवर लावा आणि अर्धा तास तसेच ठेवा. मास्क संपूर्णपणे सुकल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि केसांना कंडिशनिंग करा. या शिकेकाईच्या हेअर मास्कमुळे केस गळणे थांबण्यासोबतच केसांच्या अनेक समस्या दूर होतात. 

डेड स्किनमुळे चेहरा डल दिसतो? हा घ्या डेड स्किन रिमुव्हल मास्क, पार्लरला जाण्याचीही गरज नाही...

२. शिकेकाईची शाम्पू पावडर... 

शिकेकाईची शाम्पू पावडर बनवण्यासाठी २५० ग्रॅम शिकेकाई, १०० ग्रॅम रिठा, १०० ग्रॅम मेथी दाणे, १ वाटी कडुनिंबाची पाने, ५० ग्रॅम सुका आवळा, १ वाटी कढीपत्ता एवढ्या गोष्टी लागतात. हे सगळे सुके जिन्नस मिक्सला लावून बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावेत. त्यानंतर चाळणीत घालून ही पावडर चाळून घ्यावी. चाळून घेतलेली पावडर एअर टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवावी. ही पेस्ट वापरताना आपल्याला हवी तेवढी पेस्ट घेऊन त्यात पाणी मिसळून मिक्स करावे. ही पेस्ट केसांना शाम्पू सारखी लावून १० मिनिटे केसांवर तशीच ठेवून द्यावी. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.    

३. शिकेकाईचे तेल... 

शिकेकाई तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे तेल घरच्या घरी बनवणे सोपे आहे आणि ते केसांना मजबूत, लांब आणि चमकदार बनवण्यास मदत करते. १ टेबलस्पून शिकेकाई पावडर, २ कप खोबरेल तेल, १/२ कप बदाम तेल, १/४ कप जाईचे तेल असे साहित्य लागते. एका भांड्यात शिकेकाई पावडर आणि खोबरेल तेल घ्यावे. हे द्रावण मंद आचेवर गरम करा आणि १० ते १५ मिनिटे उकळू द्यावे. तेल गरम झाल्यानंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात बदाम तेल आणि जाईचे तेल घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण गाळून घ्या आणि एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. आपले शिकेकाईचे तेल तयार आहे.

ओल्या केसांवर तेल लावताय? थांबा, त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात योग्य पद्धत, नाहीतर केसांचे त्रास वाढतील...

Web Title: How To Use Shikakai For Hair Growth 3 different ways to use Shikakai in your hair care routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.