आपल्यापैकी बऱ्याच जणांची सकाळ ही चहाच्या घोटाने होते. अनेकांना सकाळी उठल्यावर चहा प्यायला आवडतो. चहा बनवताना आपण चहा पावडर आवर्जून घालतो. असा एखादा क्वचित व्यक्ती असेल जो सकाळी उठल्यावर चहा पीत नसेल. चहा पावडर टाकल्यानंतर चहा अत्यंत कडक बनते व ही चहा प्यायल्याने आपला दिवस देखील चांगला जातो परंतु आपल्यापैकी अनेक जण चहा बनवल्यानंतर जी उरलेली चहा पावडर असते ती कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतात. असे करणे खरे तर चुकीचे आहे.
आपल्यापैकी अनेक जण चहा बनवल्यानंतर चहा चहाच्या पानांची पत्ती फेकून देतात परंतु तसे करू नका. आपण जी चहाच्या पानांची पत्ती टाकलेली आहे ती आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवायला ठेवायची आहे. उन्हामध्ये वाळवल्यानंतर तिचा रंग देखील बदलून जातो. सर्वसामान्यपणे चहापत्तीचा रंग काळा असतो परंतु वापरल्यानंतर चहा पावडरचा रंग ब्राऊन होतो. आता ही वापरलेली चहाची पत्ती आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. निरुपयोगी समजून आपण ही चहापत्ती फेकून देतो पण असे न करता आपण त्याचा वापर करून चेहऱ्याचे व केसांचे सौंदर्य अधिक खुलवू शकतो. या चहापत्तीचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात(how to use tea leaves for get rid of tanning sunburn dead skin cells and oily skin problem).
चहाच्या पानांची पत्ती फेकून न देता त्वचा व केसांचे सौंदर्य असे खुलवा...
१. चहाच्या पानांचे स्क्रब बनवा :- चहाच्या पानांचा स्क्रब बनवून त्वचेच्या चांगल्या आरोग्यसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी चहाची पाने थोड्या पाण्यात टाकून उकळा. नंतर त्याचे पाणी काढून पाने गाळून स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर चहाच्या पानात थोडे मध, गुलाबपाणी, तांदळाचे पीठ आणि लिंबाचा रस मिसळून स्क्रब बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि बोटांनी चेहेऱ्यावर गोलाकार आकारात मसाज करावा. आता किमान १५ मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्या, नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...
२. टॅनिंग निघून जाईल :- त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी चहाची पाने उपयोगी ठरतात. चहाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट घटक त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासून मुक्त करण्यात मदत करतात. याचा वापर केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा मुलायम होते.
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...
३. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करतात :- काळी वर्तुळे चेहऱ्याचे सौंदर्य फिके पाडण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत, डोळ्यांखालील काळी वर्तुळे काढण्यासाठी आपण चहाच्या पानांच्या स्क्रबचा वापर करू शकता. डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासोबतच त्वचा मुलायम बनवण्याचे मुख्य काम केले जाते.
४. तेलकट त्वचेपासून सुटका मिळेल :- तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी आपण चहाच्या पानांचा वापर करू शकता. भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट घटक असलेली चहाची पाने तेलकट त्वचेची समस्या कमी करण्यातही चांगली भूमिका बजावतात. त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करून त्वचेची खुली छिद्रे बंद करण्यास ही चहाची पाने उपयुक्त ठरतात.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
५. मृत त्वचेच्या पेशी काढल्यास उपयुक्त :- त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यात चहाची पाने चांगली भूमिका बजावतात. यासाठी आपण चहाच्या पानांचा स्क्रब बनवून पंधरा दिवसांतून एकदा वापरू शकता. यामुळे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकून त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी हे फायदेशीर ठरते.
६. केसातील कोंडा होईल दूर :- जर आपले केस गळत असेल, केसांत कोंडा झाला असेल तर अशावेळी एका पातेल्यामध्ये चहा पावडर व लिंबूच्या काही फोड्या घालून हे मिश्रण व्यवस्थित उकळून गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर हे बनवलेले मिश्रण केसांच्या मुळाशी लावायचे आहे. असे केल्याने आपले केस मजबूत राहतील. केसांमध्ये असलेला कोंडा निघून जाईल.