Lokmat Sakhi >Beauty > केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

How to Use Tulsi For Hairs (Kes Vadhavnyache Upay) : जर तुमचे केस फारच विरळ झाले असतील तर त्यावर तुळशीचा वापर करुन तुम्ही केसांची लेंथ वाढवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 01:42 PM2024-01-26T13:42:28+5:302024-01-26T15:32:49+5:30

How to Use Tulsi For Hairs (Kes Vadhavnyache Upay) : जर तुमचे केस फारच विरळ झाले असतील तर त्यावर तुळशीचा वापर करुन तुम्ही केसांची लेंथ वाढवू शकता.

How to Use Tulsi For Hairs : How to Use Tulsi For Hair Growth Tulsi Benefits These Tricks For Smooth Hair | केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस

केस गळणं, केसांना फाटे फुटणं,  केस  पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी काहीजण महागड्या उत्पादनांचा वापर करतात तर काहीजण घरगुती उपाय करतात. ( Tulsi For Hair Growth)  घरगुती उपायांमध्ये तुळशीचा वापर  पूर्वापार केला जात आहे.  (Home  Remedies Hair Growth) तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी-खोकला दूर होतो इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यासही मदत होते.  जर तुमचे केस फारच विरळ झाले असतील तर त्यावर तुळशीचा वापर करुन तुम्ही केसांची लेंथ वाढवू शकता. (How to Use Tulsi For Hairs)

तुळशीचे केसांना होणारे फायदे

लाईव्ह आयुर्वेदच्या रिपोर्टनुसार तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत होते आणि स्काल्प टॉक्सिन्स, प्रदूषणापासून सुरक्षित राहतो. यामुळे खाज येणं, इरिटेशन, फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तुळशीत एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल,एंटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. ज्यामुळे स्काल्पचे गंभीर त्रास उद्भवत नाहीत. केस आतल्या बाजूने सॉफ्ट होतात आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. 

नारळाचे तेल आणि तुळशीची पानं

सगळ्यात आधी तुळशीची काही पानं घ्या आणि उन्हात सुकवा. ही पानं सुकवण्याआधी  धुवायला विसरू नका. जेव्हा सर्व पानं सुकतील तेव्हा एका बाऊलमध्ये नारळाचं तेल घाला. त्यात तुळशीची सुकलेली पानं आणि आवळा पावडर मिसळा त्यानंतर  गरम करून घ्या ५ मिनिटांनी गॅस बंद करा. जेव्हा हे तेल पूर्ण थंड होईल तेव्हा बाटलीत भरा. या तेलाने आठवड्यातून  २ वेळा केसांची मसाज करा 

तुळस आणि नारळाची साय

केस जास्त तेलकट असतील तर तुम्ही नारळाच्या तेलाऐवजी नारळाच्या मलईचा वापर करू शकता. ही नारळाची मलई काढून त्यात तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. या पेस्टने केसांची मसाज करा त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट केसांना लावल्यास कोंड्यांची समस्या दूर होते. या पेस्टने केसांची हळूहळू मसाज करा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांमध्ये कोंडा होणार नाही.

Web Title: How to Use Tulsi For Hairs : How to Use Tulsi For Hair Growth Tulsi Benefits These Tricks For Smooth Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.