Join us

चेहऱ्यावर सर्वत्र पिंपल्स? मध-हळदीचा ‘हा’ उपाय करा, पिंपल्सचा त्रास कमी होतो सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 15:27 IST

How To Use Turmeric & Honey For Pimples : Easy Honey & Turmeric Face Packs for Pimple : How to use turmeric and honey for pimples overnight : त्वचेवरील पिंपल्स पॅच घालवण्यासाठी मध हळदीचा घरगुती उपाय...

त्वचेवर पिंपल्स येणं ही आता फार कॉमन समस्या झाली आहे. आजकाल बहुतेकजणींच्या चेहऱ्यावर लहान - मोठे पिंपल्स कमी अधिक प्रमाणांत येत असतात. त्वचेवर पिंपल्स येण्याची (How To Use Turmeric & Honey For Pimples) अनेक कारण असू शकतात. एकदा का हे पिंपल्स त्वचेवर आले की जाताजात नाहीत. त्वचेवर ज्या ठिकाणी पिंपल्स येतात तो भाग हलकासा लालसर होऊन थोडा फुगतो, यालाच 'पिंपल्स पॅच' असे देखील म्हटले जाते. अनेक उपाय करून बरेचदा चेहऱ्यावरील पिंपल्स जातात खरे परंतु हा 'पिंपल्स पॅच' तसाच राहतो(Easy Honey & Turmeric Face Packs for Pimple).

त्वचेवरील असे पिंपल्स पॅच वाढू लागले तर त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य हरवून त्वचा खराब दिसू लागते. त्वचेवरील हे पिंपल्स पॅच घालवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम्स लावण्यापेक्षा किंवा इतर उपाय करण्यापेक्षा आपण एक सोपा घरगुती उपाय देखील करू शकतो. हे पिंपल्स पॅच घालवण्यासाठी आपण घरगुती उपाय करताना मध आणि हळदीचा वापर करु शकतो. फक्त चमचाभर मध - हळदीचा वापर करून आपण हे त्वचेवरील पिंपल्स पॅच कसे कमी करु शकतो, ते पाहूयात(How to use turmeric and honey for pimples overnight).

त्वचेवरील पिंपल्स पॅच कमी करण्यासाठी मध - हळद असरदार... 

त्वचेवरील पिंपल्स पॅच कमी करण्यासाठी आपल्याला मध, हळद, ईअर बड्स आणि टिश्यू पेपर, चिकटपट्टी इतक्याच साहित्याची गरज लागणार आहे. पिंपल्स पॅच कमी करण्यासाठी हा मध - हळदीचा खास उपाय आपण इंस्टग्रामवरील miss.narang या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 

१. सगळ्यात आधी एका छोट्या बाऊलमध्ये चमचाभर हळद आणि मध घेऊन ते एकत्रित मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 

२. ही तयार पेस्ट पिंपल्स पॅचवर ईअर बड्सच्या मदतीने लावून घ्यावी. 

३. आता मध - हळदीची पेस्ट पिंपल्स पॅचवर लावल्यानंतर त्यावर टिश्यू पेपरचा एक लहानशा तुकडा कापून चिकटपट्टीच्या मदतीने चिकटवून घ्यावा. 

४. आता हे असेच रात्रभर त्वचेवर ठेवून द्यावे. 

५. सकाळी ही चिकटपट्टी काढून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर आपल्याला त्वचेत बदल दिसून येईल. त्वचेवरील पिंपल्स पॅच कमी होण्यास मदत मिळते. आठवड्यातून किमान २ वेळा तरी हा उपाय केल्यास त्वचेवरील पिंपल्स पॅच कमी होऊ शकतात. 

फक्त चेहऱ्याला स्क्रब करू नका, 'या' ४ अवयवांचेही स्क्रबिंग आवश्यक, नाहीतर ऐन तारुण्यात येईल म्हातारपण....

कितीही शाम्पू लावा, तेल चोपडा केस गळतातच? ‘ही’ आहेत केस गळण्याची ५ खरीखुरी कारणं...

त्वचेसाठी मध - हळद फायदेशीर... 

१. मध :- त्वचेला मध लावल्यामुळे पिंपल्स आल्याने त्वचेची होणारी जळजळ आणि लालसरपणा तसेच डाग बरे होण्यास मदत मिळते.     

२. हळद :- पिंपल्स पॅच कमी करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. जे त्वचेवरील प्रदूषण आणि घाण दूर करून त्वचेचं रक्षण करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी