सगळ्याच वयोगटातील लोकांचे केस पांढरे होताना दिसतात. (Grey Hairs) ताणतणाव, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. (How To Prevent Premature Graying Of Hairs) केस पिकल्यानंतर ते पुन्हा काळे करायचं म्हणजे मोठं टेंशन असतं कारण डाय लावल्यामुळे केस कलरने काळे केल्यासारखे दिसून येतात. केस पिकले असतील आणि केसांचा काळेपणा टिकून राहावा यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How Turmeric Can Help Combat Early Grey Hairs)
केसांवरील हळदीच्या वापराबाबत संशोधन काय सांगते?
संशोधनानुसार हळदीच्या रायझोम्समध्ये केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्याची क्षमता असते. ज्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यास मदत होते. (Ref) केस पांढरे होणं हे केसांमधील मेलामाईन कमी झाल्यामुळे उद्भवते. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर हे जास्तीत जास्त उद्भवते. सिथेंटिक रंग वापरल्यामुळे टाळूवर अनेकदृष्ट्या चुकीचे परिणाम दिसून शकतात. लालसरपणा, पुळ्या, खाज येणं, त्वचेवर जळजळ होणं यांसारख्या एलर्जिक रिएक्शन्स उद्भवतात.
केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदीत कर्क्युमिनोइड्स, डेस्मेटोक्सिकरक्युमीन असते. हळदीत तेलाची पातळी जवळपास ३ टक्के असते. केसांना ग्रे रंग देण्यासाठी तुम्ही हळदीपासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करू शकता.
साई पल्लवीच्या लांब-घनदाट केसांचे सिक्रेट; ती केसांना लावते किचनमधला १ पदार्थ, तुम्हीही लावा..
पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा? (Home Remedies For Hair Hairs)
1) एका भांड्यात तेल गरम करून त्यात हळद घाला. हळद काळपट झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. त्यात व्हिटामीन ई ची कॅप्सूल घाला. यात एका लिंबाचा रस घालून पुन्हा एकजीव करून घ्या.
2) हा नैसर्गिक हेअर डाय केसांना काळेभोर बनवण्यात मदत करेल. हा डाय केसांना लावण्यासाठी केस स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हाताता ग्लोव्हज घालून ब्रशच्या साहाय्याने हे मिश्रण केसांना लावा.
3) १ तासाने केस स्वच्छ धुवा. या उपायाने केसांचा काळेपणा परत येण्यास मदत होईल आणि नैसर्गिक चमकही येईल. केस काळे करण्यासाठी हा सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. पहिल्यांदा हा उपाय केल्याने केस चमकदार पिवळ्या शेडमध्ये दिसतील आठवड्यातून २ ते ३ वेळा उपाय केल्याने केस काळेभोर व्हायला सुरूवात होईल.
4) हळदीतील औषधी गुणधर्मांमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस लांबसडक, दाट होतात. केसांची काळजी घेण्यासाठी हळदीचे घरगुती उपाय नक्कीच करायला हवेत. हळद बऱ्याच सौंदर्य उत्पादनांमध्येही वापरली जाते.