Lokmat Sakhi >Beauty > केसांना द्या गोल्डन ट्रिटमेण्ट, हळदीचा लेप करेल केसांवर सुंदर जादू; करुन पाहा गोल्डन मसाल्याचा उपाय

केसांना द्या गोल्डन ट्रिटमेण्ट, हळदीचा लेप करेल केसांवर सुंदर जादू; करुन पाहा गोल्डन मसाल्याचा उपाय

हळदीमधील (turmeric) औषधी गुणधर्म हे फक्त आरोग्य आणि त्वचेसाठीच फायदेशीर असतात असं नाही तर केसांसाठीही हळद फायदेशीर (turmeric for hair care) असते. केसांच्या अनेक समस्यांवर हळद ही औषधासारखी काम करते. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फोर्मेशन'ने केलेल्या संशोधनात हळद ही केसांसाठी टाॅनिकचं (turmeric is tonic for health) काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 06:00 PM2022-08-19T18:00:00+5:302022-08-19T18:11:54+5:30

हळदीमधील (turmeric) औषधी गुणधर्म हे फक्त आरोग्य आणि त्वचेसाठीच फायदेशीर असतात असं नाही तर केसांसाठीही हळद फायदेशीर (turmeric for hair care) असते. केसांच्या अनेक समस्यांवर हळद ही औषधासारखी काम करते. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फोर्मेशन'ने केलेल्या संशोधनात हळद ही केसांसाठी टाॅनिकचं (turmeric is tonic for health) काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

How to use turmeric for hair care? | केसांना द्या गोल्डन ट्रिटमेण्ट, हळदीचा लेप करेल केसांवर सुंदर जादू; करुन पाहा गोल्डन मसाल्याचा उपाय

केसांना द्या गोल्डन ट्रिटमेण्ट, हळदीचा लेप करेल केसांवर सुंदर जादू; करुन पाहा गोल्डन मसाल्याचा उपाय

Highlightsहळदीचा उपयोग केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी होतो.केसांना हळदीचा लेप लावल्यास केस वेळेआधीच पांढरे होण्याचा धोका कमी होतो.हळदीच्या लेपांमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. 

हळद म्हणजे स्वयंपाकघरातील गोल्डन मसाला. पदार्थांना विशिष्ट रंगासोबतच ते पौष्टिक करण्यात हळदीची भूमिका महत्वाची असते. हळदीमधील औषधी गुणधर्मांमुळे हळद (turmeric)  ही घरगुती उपायांमध्ये, छोट्या मोठ्या आजारांवरील आजीच्या बटव्यातील औषधांमध्ये वापरली जाते. त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी हळद ही प्रभावी ठरते. हळदीमधील औषधी गुणधर्म हे फक्त आरोग्य आणि त्वचेसाठीच फायदेशीर असतात असं नाही तर केसांसाठीही हळद फायदेशीर (turmeric for hair care)  असते. केसांच्या अनेक समस्यांवर हळद ही औषधासारखी काम करते.  'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फोर्मेशन'ने केलेल्या संशोधनात हळद ही केसांसाठी टाॅनिकचं काम करत असल्याचं आढळून आलं आहे. स्कॅल्प सोरायसिस सारख्या आजारात हळद ही उपचारासाठी       ( how to use turmeric for hair care) वापरली जाते. केसांची वाढ होण्यासाठीही (benefits of turmeric to hair)  हळदीचा उपयोग होतो. 

Image: Google

केसांसाठी हळद फायदेशीर कशी?

 1. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फोर्मेशन'च्या वेबसाइटवर प्रकाशित एका शोध निंबधाच्या संदर्भानुसार रक्त प्रवाह कमी झाल्यास केस गळतात. हळदीचा उपयोग केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी होतो असं या शोध निबंधात म्हटलं आहे. 

2. हळदीमध्ये जिवाणुविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळेच केसांना हळद लावल्यास डोक्यातील कोंडा निघून जातो.  केसांवर हळद आणि खोबऱ्याच्या तेलाचा एकत्रित उपयोग केल्यास कोंड्याची समस्या सहज दूर होवून केसांच्या मुळांचं रक्षण होतं. 

3. केसांना हळदीचा लेप लावल्यास केस वेळेआधीच पांढरे होण्याचा धोका कमी होतो. एका संशोधनात आढळून आलं आहे की हळदीमध्ये असलेलं करक्युमिन हा घटक ॲण्टिऑक्सिडण्ट असून त्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. 

Image: Google

केसांवर लावा हळदीचे लेप!

1. केसांवर हळदीचे लेप दोन पध्दतीनं लावता येतात.  हळदीचा लेप तयार करण्यासाठी 2 चमचे कच्चं दूध, 1 चमचा मध आणि 1 चमचा हळद घ्यावी. या सामग्रीचा वापर करुन हळदीचा लेप तयार करताना एका वाटीत सर्व सामग्री एकत्र करावी. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना आणि केसांना लावावं. हळदीचा लेप लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस आधी कोमट पाण्यानं धुवावेत आणि नंतर केस शाम्पूनं स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून एकदा हा हळदीचा लेप केसांना लावल्यास फायदेशीर ठरतो. 

2. दुसऱ्या पध्दतीनं हळदीचा लेप तयार करण्यासाठी 4 चमचे खोबऱ्याचं तेल आणि 1 -2 हळकुंडं घ्यावेत. आधी एका वाटीत खोबऱ्याचं तेल कोमट करावं. तेल कोमट झालं की त्यात हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घालावेत. हळकुंडाचे तुकडे घालून तेल चांगलं गरम करावं. तेल गरम झालं की तेलातील हळकुंडाचे तुकडे काढून घ्यावेत. तेल थंड होवू द्यावं आणि मग केसांना लावावं. तेल लावल्यानंतर 15 मिनिटांनी केस पाण्यानं धुवावेत आणि नंतर केसांना शाम्पू लावावा. आठवड्यातून एकदा हा लेप केसांना लावल्यास फायदेशीर ठरतो. 

Web Title: How to use turmeric for hair care?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.