Join us  

चमचाभर हळदीने पांढरे केस होतील काळेभोर; 'या' पद्धतीने केसांना लावा-डायची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:13 PM

How to use Turmeric on Grey Hairs : स्वयंपाकघरातला एक पदार्थ तुमचे केस काळे करू शकतो. याचे कोणते साईड इफेक्ट्सही उद्भवणार नाहीत.

काळे- लांब केस प्रत्येकालाच आवडतात. पण प्रदूषण, पोषक तत्वांची कमतरता, हार्मोनल असंतुलन, चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीच्या उत्पादनांचा वापर यामुळे  कमी वयातच केस पांढरे व्हायला सुरूवात होते आणि लोक वयापेक्षा १० वर्षांनी म्हातारे दिसतात. (How to use Turmeric on Grey Hairs) यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. (Home remedies for white hairs)

अनेकजण केस काळे करण्यासाठी  वेगवेगळ्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. ज्यामुळे केसांचं नुकसानही होऊ शकतं. स्वयंपाकघरातला एक पदार्थ तुमचे केस काळे करू शकतो. याचे कोणते साईड इफेक्ट्सही उद्भवणार नाहीत. केसांना काळे करण्यासाठी हळदीचा वापर कसा करायचा ते पाहूया. ( Natural Remedies for Premature Greying of Hair)

हळद आणि मध

केसांना काळे करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी घ्या. त्यात १ चमचा हळद, २ चमचे मध आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. १५ ते २० मिनिटासांठी केसांना तसंच लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हे मिश्रण लावल्याने केस मऊ आणि सिल्की होतील.

ओठ काळपट दिसतात? मऊ-गुलाबी ओठांसाठी ३ उपाय, लिपबाम-लिपस्टीक लावणंच विसराल

हळद आणि नारळाचं तेल

केसांना काळे करण्यासाठी तुम्ही हळद आणि नारळाचं तेल वापरू शकता. यासाठी ३ ते ४ चमचे नारळाचं तेल एका भांड्यात काढून घ्या. तेल हलकं गरम झाल्यानंतर १ चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने केसांची मसाज करा. केसांवर २० मिनिटांसाठी हे मिश्रण लावलेले राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे हेअर ग्रोथ चांगली होईल आणि  केस काळेभोर राहतील.

केसांना तेल लावून झोपल्यावर चेहरा चिपचिपा होतो? केसांचे तेल चेहऱ्यावर उतरु नये म्हणून....

हळद आणि एलोवेरा

हळद आणि एलोवेराच्या मदतीने तुम्ही केस काळे करू शकता. याचा वापर करण्यासाठी  एका वाटीत १ चमचा हळद,  १ कप पाणी आणि १ चमचा एलोवेरा जेल घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून १ तासासाठी तसेच राहू द्या. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. हा स्प्रे केस काळे करण्यासह केसांना चमकदार बनवण्यास मदत करतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी