Join us

ग्लोईंग आणि मुलायम त्वचेसाठी व्हिटामिन ई कॅल्सूल कशी लावाल? महागडे क्रीमही ठरतील फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:14 IST

Vitamin E for skin : त्वचेवरील डाग दूर करायचे असेल, पुरळ दूर करायची असेल, त्वचा उजळ करायची असेल तर ही कॅप्सूल खूप फायदेशीर ठरते.

Vitamin E for skin : हिरव्या रंगाची व्हिटामिन ई कॅप्सूल तुम्ही अनेकदा पाहिली असेलच. व्हिटामिन ई त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळेच अनेक एक्सपर्ट ही कॅप्सूल त्वचेसाठी वापरण्याचा सल्ला देत असतात. ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी तुम्ही या कॅप्सूलचा वापर करू शकता. त्वचेवरील डाग दूर करायचे असेल, पुरळ दूर करायची असेल, त्वचा उजळ करायची असेल तर ही कॅप्सूल खूप फायदेशीर ठरते. अशात याचा वापर कसा करावा आणि याचे फायदे काय मिळतात हे जाणून घेऊया.

व्हिटामिन ई कॅप्सूलचे फायदे

- व्हिटामिन ई कॅप्सूल त्वचेवर लावल्यानं त्वचा मुलायम होते. 

- व्हिटामिन ई कॅप्सूल लावल्यानं त्वचा चमकदार होते. त्वचा अधिक तरूण दिसते.

- चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील व्हिटामिन ई कॅप्सूल फायदेशीर ठरते.

- सूर्याच्या प्रखर किरणांपासून देखील व्हिटामिन ई कॅप्सूल  त्वचेचा बचाव करण्यास मदत करते.

- कमी वयातच चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील व्हिटामिन ई कॅप्सूल फायदेशीर ठरते.

- उन्हाळ्यात ही कॅप्सूल त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

त्वचेवर कशी लावाल?

- व्हिटामिन ई कॅप्सूलचा अधिक फायदा मिळवण्यासाठी ती संत्र्याच्या ज्यूसमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावायला हवी. हे मिश्रण चेहऱ्यावर साधारण 15 मिनिटं लावून ठेवा. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. यानं चेहऱ्यावर ग्लो येईल.

-व्हिटामिन ई कॅप्सूल तुम्ही चेहऱ्यावर दह्यात मिक्स करूनही लावू शकता. 

- कोरफडीच्या गरामध्ये व्हिटामिन ई कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

- ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी व्हिटामिन ई कॅप्सूल ऑलिव ऑइलमध्ये मिक्स करून त्वचेवर लावू शकता.

व्हिटामिन ई कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावू शकता का?

व्हिटामिन ई कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावू नये. संवेदनशील त्वचा असलेल्यांनी अशी चूक अजिबात करू नये. व्हिटामिन ई मधील तेल घट्ट असतं. जर हे थेट चेहऱ्यावर लावलं तर पिंपल्सची समस्या वाढू शकते. तसेच त्वचेवर जळजळ आणि इरिटेशनही होऊ शकतं.

काय काळजी घ्याल?

व्हिटामिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करावी. जर जळजळ होत असेल तर कॅप्सूलमधील तेल त्वचेसाठी अजिबात वापरू नका. 

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स