पंचविशी- तिशीचा टप्पा ओलांडला की अनेकींच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसू लागते. ज्यांना वारंवार पिंपल्स येतात, अशांच्या चेहऱ्यावरही पिंपल्सचे डाग पुढचे कित्येक आठवडे तसेच राहतात. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसतो. चेहऱ्यावरचे डाग आपल्या सौंदर्यासाठी मारकच आहेत. त्यमाुळे तुमच्याही चेहऱ्यावर असे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स किंवा वांगाचे डाग असतील तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा हा जादुई उपाय करून पाहा (Skin care treatment using vitamin E). हा उपाय केल्याने काही आठवड्यांतच चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी होईल (Benefits of Vitamin E capsule for skin), शिवाय त्वचाही अधिक तरुण- चमकदार दिसेल. (winter care tips for skin)
व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे त्वचेसाठी फायदे
१. व्हिटॅमिन ई मध्ये असलेले ॲण्टीऑक्सिडंट्स अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.
२. व्हिटॅमिन ई मध्ये असणारे नॅचरल मॉईश्चरायझर त्वचेला मुलायम आणि हायड्रेटेड ठेवतात.
३. त्वचा अधिककाळ तरुण ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलची खूप मदत होते.
४. टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळ होण्यासाठीही व्हिटॅमिन ई कॅप्सूल उपयुक्त ठरतात.
पिगमेंटेशन कमी करण्यासाठी कसा करायचा व्हिटॅमिन ई चा वापर?
१. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी रोज रात्री चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ई चा वापर करावा. यासाठी आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल एका वाटीमध्ये फोडून घ्या.
प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?
जिथे त्वचेवर पिगमेंटेशन आहे, त्या भागात व्हिटॅमिन ई लावा आणि हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. व्हिटॅमिन ई त्वचेत शोषले गेले की माॅईश्चरायझर किंवा नाईट क्रिम लावा. हा उपाय करण्याआधी पॅचटेस्ट जरूर घ्या. जर सूट झाले तरच त्याचा वापर करा.
२. या दुसऱ्या पद्धतीनुसारही तुम्ही पिगमेंटेशन कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करू शकता.
यासाठी व्हिटॅमिन ई आणि ऑलिव्ह ऑईल सम प्रमाणात एकत्र करा. रात्री झोपण्यापुर्वी हे मिश्रण त्वचेवरील डार्क स्पॉट्सवर लावा. दुसऱ्यादिवशी चेहरा धुवून टाका. काही आठवड्यातच त्वचा नितळ- स्वच्छ होईल.