Lokmat Sakhi >Beauty > चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

How To Use Vitamin E Capsule On Face : व्हिटामीन ई कॅप्सूल तोडून एलोवेरा जेलमध्ये मिसळा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटं तसंच सोडून द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:16 PM2024-10-23T23:16:15+5:302024-10-23T23:24:40+5:30

How To Use Vitamin E Capsule On Face : व्हिटामीन ई कॅप्सूल तोडून एलोवेरा जेलमध्ये मिसळा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटं तसंच सोडून द्या

How To Use Vitamin E Capsule On Face : How To Use Vitamin E Capsule For Glowing Skin | चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

चेहरा डल दिसतोय-डार्क सर्कल्स आलेत? रात्री व्हिटामीन ई कॅप्सूल या पद्धतीनं लावा, सकाळी चेहऱ्यावर येईल तेज

व्हिटामीन ई आपल्या एंटी ऑक्सिडेंट्स गुणांसाठी ओळखले जाते. त्वचेची देखभाल करण्यातही महत्वाची भूमिका निभावतात. ज्यामुळे फ्रि रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा मॉईश्चराईज राहते आणि व्रण कमी होण्यास मदत होते. तुम्ही स्किन केअर रूटीनमध्ये व्हिटामीन ई च्या गोळ्यांचा समावेश करू शकता. (How To Use Vitamin E Capsule On Face) तुम्ही व्हिटामीन ई च्या गोळ्यांचा वापर करून घरच्याघरी फेस मास्क बनवू शकता. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.  व्हिटामीन ई च्या गोळ्यांनी फेस पॅक कसा तयार करायचा समजून घेऊ. (How To Use Vitamin E Capsule For Glowing Skin)

व्हिटामीन ई त्वचेला मॉईश्चराईज करते. ज्यामुळे स्किन मऊ आणि मुलायम राहते. व्हिटामीन ई फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळते आणि वाढत्या वयाची लक्षणंही कमी करता येतात. व्हिटामीन ई त्वचेचे डाग आणि व्रण कमी करण्यास मदत करते. चेहऱ्यावरची सूज कमी होते. व्हिटामीन ई त्वचेचा रंग सुधारते आणि त्वचा  चमकदार बनवते. व्हिटामीन ए चा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही घरगुती साहित्याचा वापर करू शकता.

व्हिटामीन ई कॅप्सूल तोडून एलोवेरा जेलमध्ये मिसळा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटं तसंच सोडून द्या. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. व्हिटामीन ई कॅप्सूल तोडून तुम्ही मधात मिसळू शकता. हे मिश्रण चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. दह्यासोबत ही कॅप्सूल मिसळून १५ ते २० मिनिटांसाठी तसंच सोडा आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा.

दुसरी पद्धत

ओट्स दुधामध्ये भिजवून पेस्ट तयार करा. यात व्हिटामीन ई कॅप्सूल मिसळा. नंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनिटं तसंच सोडून द्या. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. 

व्हिटामीन ई चा फेस पॅक चेहऱ्याला कसा लावावा?

आधी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. नंतर फेस मास्कचा पातळ थर चेहऱ्याला लावा. डोळे आणि ओठांच्या भागात लावू नका. १५ ते २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा फेस मास्क लावा. जर तुम्हाला व्हिटामीन ई ची एलर्जी असेल या उपायाचा वापर करू करा. चेहऱ्याला लावण्याआधी आपल्या हातावर लावून पाहा जळजळ किंवा लालसरपणा येत असेल याचा वापर करू नका.

Web Title: How To Use Vitamin E Capsule On Face : How To Use Vitamin E Capsule For Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.